Headlines

शिवसेना म्हणजे भरकटलेलं जहाज, बेताल वक्तव्ये करणारे प्रवक्तेच शिल्लक राहणार- राधाकृष्ण विखे पाटील | radhakrishna vikhe patil criticizes uddhav thackeray and sanjay raut on revolt in shivsena

[ad_1]

शिवसेना पक्षात झालेल्या अभूतपूर्व बंडानंतर राज्यात सत्ताबदल झाला आहे. तब्बल ४० आमदार फुटल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर राज्याचा कारभार शिंदे गट आणि भाजपा यांच्याकडून संयुक्तपणे हाकला जातोय. शिवसेनेचे उघडपणे दोन गट पडल्यानंतर आता काही खासदारदेखील एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या संपर्कात असल्याचे म्हटले जात आहे. असे असताना भाजपाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी प्रत्यक्ष नाव न घेता उद्धव ठाकरे तसेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. शिवसेनेत फक्त बेताल वक्तव्ये करणारे प्रवक्तेच शिल्लक राहतील, असे विखे पाटील म्हणाले आहते. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे.

हेही वाचा >>> ‘रिक्षाने मर्सिडीजला मागे टाकलं’ म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना शिवसेनेकडून उत्तर; विनायक राऊत म्हणाले “त्यांच्या विद्वत्तेबद्दल…”

“शिवसेनेचे १२ खासदारही बाहेर पडण्याची शक्यता आहे. शिवसेना भरकटलेलं जहाज होतं. यामध्ये बेताल वक्तव्ये करणारे प्रवक्ते होते. आता शिवसेनेमध्ये तेवढेच शिल्लक राहतील असे मला वाटत आहे,” असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत.

हेही वाचा >>> Maharashtra Cabinet | एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात भाजपाला २५ मंत्रीपदे? शिंदे गटाच्या वाट्याला किती?

तसेच, “शिवसेनेची काँग्रेसपेक्षा वेगळी अवस्था होईल, असं मला वाटत नाही. आज पक्षाच्या नेतृत्वावर लोकांचा विश्वास राहिला नाही. याचं दु:ख पक्षनेतृत्वालाही असेल. आज ५५ पेक्षा ४० आमदार आज बाहेर पडले आहेत. आता उरलेल्या १५ आमदारांपैकी आणखी काही आमदार बाहेर पडण्याची शक्यता आहे,” असे भाकित विखे पाटील यांनी व्यक्त केले.

हेही वाचा >>> “आदित्य ठाकरेंना सुरतला पाठवतो असं मुख्यमंत्री म्हणाले, त्यावेळी…”; संजय राऊतांसंदर्भात आमदाराचा खळबळजनक दावा

दरम्यान, शिवसेनेचे ४० आमदार फुटल्यानंतर शिंदे (Eknath Shinde Camp) गटाच्या संपर्कात आणखी काही आमदार तसेच खासदार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेनेतून आणखी काही नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक पातळीवरदेखील शिवसेनेला मोठा फटका बसताना दिसतोय. ठाणे महानगरपालिकेतील ६७ पैकी तब्बल ६६ नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. हातातून ठाणे महापालिका जाणे म्हणजे उद्धव ठाकरे तसेच शिवसेना पक्षाची ही मोठी हानी असल्याचे म्हटले जात आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *