Headlines

shivsena leader neelam-gorhe comment on arjun-khotkar and cm eknath shinde meeting

[ad_1]

जालन्याचे माजी आमदार अर्जुन खोतकर सोमवारी मुख्यमंत्री शिंदे आणि केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्या भेटीला दिल्लीला पोहोचले होते. यामुळे अर्जुन खोतकर शिंदे गटात सहभागी झाले आहेत, असा अर्थ काढला जात आहे. यावरुन शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी अर्जुन खोतकरांना सल्ला दिला आहे.

राजकीय भाष्य करण्यास गोऱ्हेंचा नकार

खोतकर आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीवर कोणतेही राजकीय भाष्य करणे निलम गोऱ्हेंनी टाळलं आहे. मात्र, महाभारतातील उदाहरण देत “अर्जूनानं कृष्णरुपी ठाकरेंकडे जावं”, असा सल्ला निलम गोऱ्हेंनी खोतकरांना दिला आहे.

खोतकर आणि शिंदेंच्या भेटीने चर्चांना उधाण

“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण अंगिकारून एकनाथ शिंदे यांनी आपली वाटचाल सुरू केली. त्यामुळे खोतकरांनी एकनाथ शिंदेंचे हात भक्कम करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या शिवसेना–भाजपा युती सरकारला पाठींबा दिला असल्याचे शिंदे गटाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्रष ईडी’ च्या कारवाईमुळे अडचणीत आलेल्या खोतकर शिंदे गटात सामील होत असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

खोतकरांकडून भेटीबाबत स्पष्टीकरण

मात्र, खोतकरांकडून या भेटीबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. “मी माझ्या व्यक्तिगत कामासाठी दिल्लीला आलो आहे. एकनाथ शिंदे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधी कार्यक्रमावरून आले आणि योगायोगाने आमची भेट झाली. भेट झाल्यानंतर चर्चा होतेच. मात्र, त्याचे वेगळे अर्थ काढू नये. मी शिंदे गटात जाण्याबाबत काहीही निर्णय बदललेला नाही.”“माझी एकनाथ शिंदे यांच्याशी केवळ भेट झाली. याचा अर्थ मी पक्ष बदलला असा होत नाही. मी शिवसेनेतच आहे,” असंही अर्जून खोतकर यांनी स्पष्ट केलं होतं. असं असलं तरी भविष्यातही शिवसेनेतच राहणार का? यावर खोतकरांनी उत्तर देणं टाळलं. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *