Headlines

shivsena leader chandrakant khaire commented on eknath shinde supreme court verdict and rebel mlas

[ad_1]

राज्यातील सत्तासंघर्षाच्या लढाईवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कामकाजावर स्थगिती आणण्यास नकार दिला आहे. यामुळे पक्षचिन्हासंबंधी निर्णय घेण्याचा निवडणूक आयोगाचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिंदे गटातील नेत्यांकडून पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. हा गद्दारांचा खोटा सत्कार असल्याची संतप्त प्रतिक्रिया यावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे.

“हा शिवसेनेला धक्का का मानावा? निवडणूक आयोग..”, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर शिवसेनेची भूमिका!

शिंदे गटाचा अजूनही विजय झालेला नाही. ही लढाई सुरूच राहिल, असेही खैरे म्हणाले आहेत. न्यायालयाच्या हा निर्णय मान्य असल्याचे खैरे यांनी म्हटले आहे. दरम्यान, न्यायालयाचा या निर्णयावर शिवसेनेकडून भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. न्यायालयाच्या हा निर्णय शिवसेनेला धक्का असल्याचे बोलले जात असतानाच हा धक्का का मानावा? असा सवाल शिवसेना नेते अनिल देसाई यांनी केला आहे. “निवडणूक आयोगासमोर हे प्रकरण येणार हे नक्कीच होते. जेव्हा पक्षांमधल्या दोन गटांमध्ये वाद असतो, तेव्हा त्याची शहानिशा करण्याचे आयोगाला अधिकार असतात” असे देसाई यांनी म्हटले आहे.

शिंदे गट-उद्धव ठाकरे वादावरील निकालानंतर अमृता फडणवीसांचे महत्त्वाचे विधान, म्हणाल्या…

शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर खरी शिवसेना कोणाची? हा वाद निर्माण झाला आहे. खरी शिवसेना शिदेंचीच असल्याचा दावा बंडखोर आमदारांकडून करण्यात आला आहे. दरम्यान, शिंदे गटाने ‘धनुष्यबाण’ या चिन्हावरदेखील दावा केला आहे. निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोग निर्णय घेईल, त्यांच्या कार्यवाहीवर कोणतीही स्थगिती नाही, असे आज न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *