Headlines

Shiv Sena deputy leader Sushma Andhare criticizes Chief Minister Eknath Shinde msr 87

[ad_1]

शिवसेना(उद्धव ठाकरे)गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधला आहे.

“विरोधासाठी विरोध अशा पद्धतीचं राजकारण चाललेलं असेल, तर एकनाथ शिंदेंना आम्ही एवढीच विनंती करू की यामध्ये तुम्ही भलेही उद्धव ठाकरे यांना नामोहरण करण्याचा प्रयत्न करत असाल, ते होणार नाही तो भाग वेगळा पण यामध्ये महाराष्ट्राचं नुकसान किती होतंय ते बघा.” असं अंधारे यांनी एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे.
यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या “ठाकरे गटाचे उमेदवार स्पष्ट आहे. दिवंगत रमेश लटके हे अंधेरी पूर्वचे आमदार होते आणि आपल्याकडे असा सर्वच पक्षात अलिखित संकेत आहे, की शक्यतो एखाद्या उमेदवाराचे त्याच्या कार्यकाळात जर निधन झालेले असेल. तर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी दिली जाते. त्यामुळे हे फार स्वाभाविक आहे की दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या ही निवडणूक लढणार आहेत.”

शिंदे गटाच्या आरोपांना काहीच अर्थ नाही –

याशिवाय “सातत्याने मिंधे गटाकडून असे प्रयत्न केले जातात की इकडे आमच्याकडे काही संभ्रमाचे वातावरण तयार होईल का? एकमेकांच्याप्रती अविश्वास तयार होईल का? पण असं काही नाही. ऋुतुजा लटके याच अगोदरपासून उमेदवार ठरलेल्या आहेत. त्यांच्याच नावावर पक्षाने सार्वमताने शिक्कामोर्तब केलेले आहे. किंबहुना मी माझ्या महाप्रबोधन यात्रेच्या पुढील तारखा जाणीवपूर्वक जाहीर केलेल्या नाहीत. कारण, ऋुतुजा लटकेंच्या निवडणूक प्रचारात महिला म्हणून आम्हालाही सहभागी व्हायचं आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून जे काही आरोप केले जाताय त्यांना काहीच अर्थ नाही.”

… हे मोंठं हास्यस्पद आहे –

तर “नगरविरकासमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी जे जे निर्णय घेतले होते, ज्या निर्णयांना मंजुरी दिली होती. मुख्यमंत्री म्हणून त्याच निर्णायांना ते विरोध करतात, हे मोंठं हास्यस्पद आहे. त्यांच्या हे लक्षातच येत नाही की ग्रामविकास मंत्रालयाचा भाग हा सुद्धा त्यांच्या अधीन होता. माणसाने किती खेळ्या कराव्यात? एसटी विलिनीकरणाचा मुद्दा जर बघितला तर जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, तेव्हा एसटी विलिनीकरणाचा मुद्दा लावून धरणारे गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, गुणरत्न सदावर्ते हे सगळे आता गप्प आहेत. ” असंही अंधारे यांनी सांगितले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *