Headlines

शिवसेना आमदार वैभव नाईकांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी

[ad_1]

शिवसेनचे आमदार वैभव नाईक यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्यात आली आहे. तर या चौकशीमागे भाजपाचा हात आहे, असा आरोप वैभव नाईक यांनी केला आहे. तसेच मी कोणाच्याही दबावाला भीक घालणार नाही, असं वैभव नाईक म्हणाले आहेत.

“एसबीकडे कोणीतरी तक्रार केली होती. या तक्रारीच्या आधारावर काल मला चौकशीसाठी हजर राहण्याचं एक समन्स मिळालं. प्राथमिक चौकशी देखील माझ्याकडे केली गेली. त्यांना जी माहिती हवी आहे ती सर्व माहिती मी त्यांनी सांगितलेल्या मुदतीच्या आतच देण्याच निश्चितपणे प्रयत्न करेन आणि त्यांना योग्य माहिती देईन.” असं आमदार वैभव नाईक यांनी टीव्ही-9 शी बोलताना सांगितलं आहे.

दबावाला आम्ही भीक घालणार नाही –

याशिवाय “२००२ ते २०२२ पर्यंत असं २० वर्षांचं विविरण मागितलं गेलं आहे, ते देखील मी देण्याचा प्रयत्न करेन. परंतु यामध्ये कुठेतरी राजकीय हस्तक्षेप असल्याची शंका मला सुद्धा आहे. आम्ही उद्धव ठाकरे यांच्यसोबत प्रामाणिकपणे या अगोदरही राहिलो आणि यापुढील काळतही राहू. आमच्यावर कोणीही दबाव आणली तरी त्याला आम्ही भीक घालणार नाही.” असं नाईक यांनी स्पष्ट केलं.

यामागे भाजपाचे नेते असल्याचा मला विश्वास –

तर “निश्चतपणे भाजपाचे काही नेते यामागे असतील असा मला विश्वास आहे. अशाप्रकारे दबाव आणून आम्हाला भाजपात आणता येईल का असा जर प्रयत्न होत असेल तर त्याला माझा कायमच विरोध राहील. त्या दबावाला आम्ही बळी पडणार नाही.” असं म्हणत त्यांनी भाजपावर थेट आरोप केला.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *