Headlines

Shisena dasara melava 2022 clashes between shinde and Uddhav Thackeray group on nashik mumbai highway

[ad_1]

नाशिक-मुंबई महामार्गावर उद्धव ठाकरे आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे. मुंबईतील शिवाजी पार्कवरील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी महिला कार्यकर्त्या बसमधून या मार्गाने प्रवास करत होत्या. यावेळी बाजूने जात असलेल्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी विचित्र हावभाव केल्याचा आरोप करत महिलांना या कार्यकर्त्यांना चोप दिला आहे. कसारा ते शाहपूर दरम्यान ही घटना घडली आहे. या दोन्ही गटांमधील वाद सध्या निवळला असून कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

Dasara Melava: शिंदे गट आणि ठाकरे गट समर्थक मुंबईत आमने-सामने आल्यास…; विश्वास नांगरे पाटील म्हणाले, “एकमेकांच्या समोर…”

उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर तर एकनाथ शिंदे गटाचा मेळावा बीकेसी मैदानावर होणार आहे. यासाठी दोन्ही ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली असून मोठ्या संख्येने कार्यकर्ते मुंबईत दाखल होत आहेत. सभेच्या काही तासांपूर्वीच कार्यकर्त्यांनी शिवाजी पार्क आणि बीकेसी मैदानावर जमण्यास सुरुवात केली आहे. शक्तीप्रदर्शन करण्यासाठी राज्यभरातील कार्यकर्त्यांना नेत्यांनी मुंबईत बोलवलं आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी मुंबईत २० हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

Dasara Melava 2022: मेळाव्याच्या काही तास आधी मुख्यमंत्री शिंदेंचं Tweet; मराठी, हिंदुत्वाचा उल्लेख करत म्हणाले, “आपण…”

“दोन्ही मेळाव्यांसंदर्भात सविस्तर नियोजन करण्यात आलं आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने विनाकारण तणाव निर्माण होणार नाही. कार्यकर्ते एकमेकांच्या समोर येणार नाहीत यासाठी रस्त्यांची विभागणी करण्यात आली आहे”, अशी माहिती पत्रकार परिषदेत सह पोलीस आयुक्त (कायदा-सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांनी दिली आहे. घातपातापासून संरक्षण करण्यासाठी सविस्तर नियोजन केलं असल्याचंही विश्वास नांगरे पाटील म्हणाले आहेत. प्रत्येक जंक्शनवर एसआरपीएफच्या ‘स्ट्राइकिंग’ पथक, ‘डेल्टा’ पथक, मोठ्या गाड्या आणि स्थानिक पोलिसांच्या अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *