Headlines

शिर्डी अधिवेशन अर्ध्यात सोडून अजित पवार नेमकं कुठे गेले होते? त्यांनीच स्वत: केला खुलासा, म्हणाले “माझ्याशिवाय यांचं…” | NCP Ajit Pawar on reports of he is disappointed with party sgy 87

[ad_1]

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिर्डी येथे आयोजित केलेल्या दोनदिवसीय मंथन शिबिराच्या समारोपाच्या संपूर्ण दिवसभर विरोधी पक्षनेते अजित पवार अनुपस्थित राहिल्याने नाराजीच्या चर्चाना उधाण आलं होतं. पहिल्या दिवशी रात्रीपासूनच ते शिबीरस्थळी दिसले नसल्याचं सांगितलं जात होतं. दरम्यान नाराजीच्या या चर्चांवर अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. पुण्यातील मावळ येथील कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी या चर्चांवरील नाराजी जाहीर केली.

“गेल्या पाच-सहा वर्षात मला विदेशात जाण्यासाठी वेळ मिळाला नव्हता. माझा एक पूर्वनियोजित कार्यक्रम ठरला होता. त्यासाठी ४ तारखेला रात्री उशिरा दीड वाजता विमान होतं आणि गुरुवारी रात्री उशिरा परतणार होतो. पण अजित पवार नाराज आहेत, कुठेतरी गेलेत अशा चर्चा उठवण्यात आल्या. माझ्याशिवाय यांचं काय नडतं मला कळत नाही. दादाला काय खासगी आयुष्य आहे की नाही,” असा संताप अजित पवारांनी व्यक्त केला.

“कारण नसताना बदनामी, गैरसमज निर्माण करण्यात आले. सहा महिन्यापूर्वी मी तिकीट काढलं होतं आणि त्यासाठीच गेलो होतो,” असं अजित पवारांनी स्पष्ट केलं.

राष्ट्रवादीच्या शिबीर समारोपाला अजित पवार गैरहजर; नाराजीच्या चर्चाना पुन्हा उधाण

दरम्यान याआधी प्रसारमाध्यमांसमोरही त्यांनी नाराजी जाहीर केली. नाराजीच्या चर्चांच्या बातम्या देणाऱ्या प्रसारमाध्यमांवर त्यांनी खापर फोडलं. तुम्ही मध्यंतरी आजारी असल्याच्या चर्चा होत्या, असं म्हणत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली. “मध्यंतरी मला खोकल्याचा त्रास होता. नंतर काही दिवस मी दौऱ्यावर होतो. रात्री उशीरा आलो. इथं काहीही बातम्या देतात, काहीही फालतू बातम्या देतात,” असं ते म्हणाले.

नेमकं काय झालं होतं?

उद्घाटनाच्या सत्रापासून शिबीरस्थळी सक्रिय असणारे अजित पवार दुसऱ्या दिवशी मात्र दिवसभर न दिसल्याने कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू झाली होती. विशेष म्हणजे गेले काही दिवस आजारी असलेले पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे प्रकृती अस्वस्थ असूनही मुंबईतील रुग्णालयातून थेट शिर्डीतील शिबिरासाठी काही काळ आले. मात्र अजित पवार त्याच वेळी शिबीरस्थळावर अनुपस्थित राहिले. ही चर्चा मोठय़ा प्रमाणात होऊ लागल्यावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी, प्रसारमाध्यमांनी गैरसमज पसरवू नये. अजित पवार शिबीर सोडून त्यांच्या आजोळी गेले असल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं.

उत्सवी स्वरूपाने नाराज?

हे शिबीर ‘विचार मंथन’, संकटात सापडलेल्या शेतकरी, कष्टकरी यांना आधार देण्यासाठी, राज्यापुढील आव्हानांचा वेध घेण्यासाठी असे जाहीर केलेले असताना शिबिराला एखाद्या सोहळय़ाचे आलेले रूप यावरूनही ते नाराज होते अशी चर्चा होती. शिबिराचा हेतू काय आणि होत असलेल्या प्रदर्शनावरून त्यांनी संताप व्यक्त केला असल्याची माहिती होती.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *