Headlines

शिंदे गटातील आमदार भाजपाच्या वाटेवर? रावसाहेब दानवे म्हणतात, “आम्ही यांना…”BJP leader Raosaheb Danve commented on Shinde group mla entry in BJP and Criticized Mahavikasaghadi

[ad_1]

शिंदे गटातील काही आमदार भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावर केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी भाष्य केलं आहे. “एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली या आमदारांनी वेगळं अस्तित्व निर्माण केलं आहे. भाजपामध्ये शिंदे गटाच्या आमदारांना घेण्याचं काहीच कारण नाही. आम्ही आता एकच आहोत. आम्हाला सरकार चालवायचं आहे. सरकारचा ऊर्वरित कार्यकाळ पूर्ण करायचा असून आगामी निवडणुकीतही हेच सरकार निवडून आणायचं आहे”, असे म्हणत शिंदे गटातील आमदारांची भाजपा प्रवेशाची शक्यता दानवे यांनी नाकारली आहे.

“…तो मर्द कसला”, शहाजी पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन एकनाथ खडसेंची टोलेबाजी; म्हणाले, “आमदार झाल्यानंतर त्यांची…”

आम्ही यांना पाडणार नाही, पण यांच्या अंतर्गत लाथाडीमुळे सरकार पडल्यास आम्हाला दोष देता कामा नये, असेही दानवे यांनी महाविकासआघाडीला उद्देशून म्हटले आहे. शिंदे गटातील आमदार भाजपाच्या वाटेवर असल्याची अफवा महाविकासआघाडीच्या नेत्यांनी पसरवल्याचेही दानवे म्हणाले आहेत. महाविकासआघाडीतील आमदार पक्के राहणार नाहीत. हे आमदारच पळण्याच्या तयारीत असल्याचा पलटवार दानवे यांनी केला आहे.

महाराष्ट्राप्रमाणे तेलंगणातही सत्तांतराचा प्रयत्न? आमदारांना ५० कोटींची ऑफर, पोलिसांची फार्महाऊसवर धाड; ‘ऑपरेशन लोटस’ पुन्हा चर्चेत

आम्ही कोणताही राजकीय पक्ष फोडणार नाही आणि कोणाचंही सरकार पाडणार नाही, ही भूमिका २०१९ च्या निवडणुकीपासून भारतीय जनता पक्षाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. “शिवसेना धोका देऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेली असली, तरी त्यांनी जनतेचे प्रश्न सोडवावेत. भाजपाच्या कल्याणकारी योजना सुरू ठेवाव्यात, तसंच त्यांनी नव्या योजनांची भर टाकावी”, असा सल्लाही दानवे यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *