Headlines

शिंदे गटाला निवडणूक चिन्ह म्हणून ढाल-तलवार मिळाल्यानंतर भाजपाची पहिली प्रतिक्रिया; शिवरायांचं नाव घेत म्हणाले, “लोकांच्या मनात…” | Shinde vs Thackeray Election Commission gives shield and sword symbol to Eknath Shinde group BJP first comment scsg 91

[ad_1]

केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाला ढाल-तलवार असं चिन्ह देण्यात आलं आहे. त्रिशूळ, गदा आणि उगवता सूर्य ही पहिल्या पसंतीची तिन्ही चिन्हं आयोगाने नाकारल्यानंतर निवडणूक आयोगाकडे आज सकाळी ढाल-तलवार, पिंपळाचं झाडं आणि शंख असे पर्याय सुचवण्यात आलेले. त्यापैकी ढाल-तलवार हे चिन्हं निश्चित करण्यात आलं आहे. या संदर्भात आता राजकीय प्रतिक्रिया समोर येत असतानाच राज्यामध्ये शिंदे गटाच्या पाठिशी असणाऱ्या भारतीय जनता पार्टीनेही यावर प्रतिक्रिया नोंदवली आहे.

नक्की वाचा >> “…त्या दिवशी मला फार दु:ख झालं”; उद्धव ठाकरेंसंदर्भातील ‘तो’ प्रसंग सांगत सुधीर मुनगंटीवार यांचं विधान

कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी ठाकरे गटाला ढाल-तलवार चिन्ह मिळाल्यासंदर्भात समाधान व्यक्त करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला आहे. “या चिन्हामध्ये ढालही आहे आणि तलवारही आहे. दोन्ही गोष्टी या ठिकाणी मिळाल्या आहेत. लोकांच्या मनात काय आहे तसेच मतदारांच्या मनात काय आहे हे लवकरच समोर येईल. शिवसैनिक कोणाच्या बाजूने आहे हे दोन्ही पक्षांमध्ये लढत झाल्यानंतर समोर येईल. ढाल आणि तलवार ऐतिहासिक चिन्ह आहे. या चिन्हाशीसंबंधित शिवाजी महाराजांपासून अनेक उदाहरण देता येतील,” असं महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी मुंबईत संवाद साधताना म्हटलं आहे.

नक्की वाचा >> ‘शिवसेना’ नाव गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे रडल्याच्या दाव्यावरुन मनसेचा टोला; म्हणाले, “आम्ही २००९ ला जिंकलो, २०१४ ला पराभूत…”

तर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी हे चिन्ह मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. “सज्जनांसाठी ढाल आणि दुर्जनांवर वार करायला तलवार. छत्रपती शिवाजी महाराजांची निशाणी आम्हाला मिळाली आहे,” असं शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया नोंदवताना म्हस्के यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> “आदित्य ठाकरेंनी तत्काळ अंमलबजावणी करत बदलले पक्षाचे नाव”; मनसेनं शेअर केलेला स्क्रीनशॉट चर्चेत

यापूर्वीच निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव देण्यास मान्यता दिली आहे. तर शिंदे गटाच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पर्यायी नावाला मान्यता दिली आहे. त्याचप्रमाणे ठाकरे गटाला निवडणूक चिन्ह म्हणून धगधगती मशाल देण्यात आली आहे. त्यामुळेच आता अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात ३ नोव्हेंबरला होणाऱ्या पोटिनवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडणार असून दोन्ही गट आपआपल्या नव्या चिन्हांसहीत मैदानात उतरणार आहे. मात्र ही जागा भाजपाकडून लढवली जाणार असल्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *