Headlines

शिंदे गटातील आमदार संजय बांगर यांची मंत्रालयातील पोलिसांना शिवीगाळ? | Shinde Faction MLA Sanjay Bangar abuse Police at Mantralaya Gate in Mumbai sgy 87

[ad_1]

शिंदे गटातील हिंगोलीचे आमदार संजय बांगर पुन्हा एकदा वादात अडकले आहेत. संजय बांगर यांनी मंत्रालयाच्या गेटवरील पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. मंत्रलायात जाताना सोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलीस कर्मचाऱ्याने थांबवत पास काढण्यास सांगितल्याने संजय बांगर संतापले आणि शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. मला ओळखत नाही का? अशी विचारणा संजय बांगर यांनी केल्याचं वृत्त ‘एबीपी माझा’ने दिलं आहे.

२७ ऑक्टोबरला ही घटना घडल्याची माहिती आहे. संजय बांगर आपल्या १५ कार्यकर्त्यांसोबत मंत्रालयात जात असताना गेटवर कॉन्स्टेबलने त्यांना अडवलं. पोलीस कर्मचाऱ्याने कार्यकर्त्यांचा पास काढण्यास सांगितल्याने संजय बांगर संतापले. त्यांनी त्या कर्मचाऱ्यासोबत वाद घातला आणि आपल्याला ओळखत नाही का? अशी विचारणा केली. पोलीस कॉन्स्टेबलने यासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे तक्रार केली आहे. संजय बांगर यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत.

संतोष बांगर यांचं म्हणणं काय?

“मी कोणत्याही प्रकारे पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घातली नाही. मी काही कार्यकर्त्यांसोबत मंत्रालयात जात असताना तेथील पोलीस कर्मचाऱ्याने डायरीत प्रवेशाची नोंद करण्यास सांगितलं. यावेळी एका कार्यकर्त्याने सोबत आमदार असल्याचं सांगितलं. त्या कर्मचाऱ्याने मला ओळखलं नव्हतं. पण ओळखल्यानंतर सन्मानाने मला आत पाठवलं. माझ्या पीएने नंतर डायरीत नोंद केली. आम्ही कोणतीही हुज्जत घातली नाही,” असा दावा संजय बांगर यांनी केला आहे. “हुज्जत घातली असेल तर सीसीटीव्ही कॅमेरे तपासा,” असंही ते म्हणाले.

“…तर त्यांच्या कानाखाली आवाज काढा” बंडखोर आमदार संतोष बांगर यांचा धमकीवजा इशारा

“मी कशासाठी पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालेन. तो बिचारा कर्मचारी सकाळपासून तिथे काम करत असतो. कर्तव्य बजावणाऱ्या त्या कर्मचाऱ्याशी मी हुज्जत घातली नाही,” असा बांगर यांचा दावा आहे.

अंबादास दानवेंची टीका

“संजय बांगर आणि वाद हे एकत्र नांदणारे आहेत. मुख्यमंत्र्यांनी समज देऊनही ते ऐकत नाहीत,” अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. दरम्यान मला मुख्यमंत्र्यांनी कोणतीही समज दिलेली नसून, त्या सर्व बातम्या चुकीच्या होत्या असं प्रत्युत्तर बांगर यांनी दिलं.

शासकीय कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या संजय बांगर यांना एकनाथ शिंदेंकडून समज, म्हणाले “तुमचा मुद्दा…”

“छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेबांनी मला अन्यायाविरोधातील लढा देण्याची शिकवण दिली आहे. ते काम मी करत आहे. पण पोलीस कर्मचाऱ्याशी कोणताही वाद घातलेला नाही,” असं बांगर म्हणाले.

संजय बांगर आणि वाद

संजय बांगर याआधीही वादामुळे चर्चेत आले आहेत. शिंदे गटात सहभागी झाल्यापासून ते तिसऱ्यांदा वादात अडकले आहेत. याआधी मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत डबे पुरवणार्या गोडाऊन व्यवस्थापकाला त्यांनी मारहाण केली होती. हा वाद चांगलाच पेटला होता. तसंच एका उपहारगृहाच्या व्यवस्थापकाला शिवीगाळ आमि मारहाण केल्यानेही वादात अडकले होते.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *