Headlines

Shaun Tait: हसवणारा मित्र अश्रू देऊन गेला..; आधी ट्विटने खळबळ नंतर सारवासारवी!

[ad_1]

Shahnawaz Dahani On Shaun Tait: पाकिस्तान आणि न्यूझीलंड (New Zealand vs Pakistan) यांच्यातील वनडे मालिका न्यूझीलंडने 2-1 ने जिंकली. मालिका गमावल्यानंतर पाकिस्तानवर सर्वस्तरावरून टीका होताना दिसत आहे. अशातच आता पाकिस्तानच्या एका क्रिकेटरच्या ट्विटने वाद पेटल्याचं पहायला मिळतंय. पाकिस्तानचा क्रिकेटर शाहनवाज दहानीच्या (Shahnawaz Dahani Tweet) ट्विटने सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलंय. (pakistani cricketer shahnawaz dahani is being trolled because of his tweet on shaun taits return to australia marathi news)

शाहनवाज दहानीने ऑस्ट्रेलिया संघाचा माजी वेगवान गोलंदाज शॉन टेटचे (Shaun Tait) फोटो शेअर केले आहेत. त्यावर त्याने “हसू आणणारा मित्र काल रात्री अश्रू देऊन निघून गेला”, असं ट्विट शाहनवाज दहानीने (Shahnawaz Dahani) केलं होतं. या ट्विटनंतर अनेकांना धक्का बसला. शाहनवाजला नेमकं काय म्हणायचंय?, याची चर्चा सुरू झाली.

शॉन टेट याचं निधन झालंय का?, असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारण्यास सुरूवात केली. तर दुसरीकडे पत्रकारांनी (journalist) देखील सुत्र हालवण्यास सुरूवात केली आणि तपास सुरू केला. त्यावेळी शॉन टेट ठिकठाक असल्याचं पहायला मिळालं. त्यानंतर शाहनवाजने सारवासारवी करण्याचा प्रयत्न केला.

आणखी वाचा – IND vs SL 3rd ODI: LIVE सामन्यात धक्कादायक घटना; श्रीलंकेचे 2 खेळाडू बेक्कार धडकले, स्ट्रेचरसहित डॉक्टर मैदानावर!

दरम्यान, अरे भाई मै पाकिस्तान क्रिकेट टीम (Pakistan cricket team) की बात कर रहा हूँ, असं शाहनवाज म्हणाला. आणखी एक ट्विट करत त्याने स्पष्टीकरण दिलं. मात्र, तोपर्यंत ही बातमी सर्वदूर पसरली होती. शॉन टेट याला देखील हे ट्विट पाहून आश्चर्याचा धक्का बसला. पाकिस्तानच्या इंग्रजीची (Pakistan English) नेहमी चर्चा होते, त्यानंतर आता शाहनवाज इंग्रजीने गोंधळ घातला, असं नेटकऱ्यांनी म्हटलंय.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *