Headlines

‘शत्रुघ्न सिन्हा यांनी ड्रग्ज पाजून माझा गैरफायदा घेतला’… प्रसिद्ध अभिनेत्रीचा अभिनेत्यावर आरोप

[ad_1]

मुंबई : अभिनेत्री पूजा मिश्राने ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.सिन्हा कुटुंबीयांनी तिचं आयुष्य आणि करिअर उद्ध्वस्त केल्याचा आरोप पूजा मिश्राने मीडियाशी बोलताना केला. शत्रुघ्न सिन्हा आणि तिच्या कुटुंबीयांनी आपल्यासोबत ‘सेक्स स्कॅम’ केल्याचा आरोप तिने केला आहे. या आरोपांवर शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

पूजा मिश्राने आरोप केला आहे की, शत्रुघ्न सिन्हा तिला बेशुद्ध करून  ट्रेड करायचे. एका मुलाखतीत बोलताना ती म्हणाली, ”शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांची मुलगी सोनाक्षीला माझी वर्जिनीटी विकून स्टार बनवलं” पूजा मिश्राच्या म्हणण्यानुसार, तिने 17 वर्षांपासून हे सगळं सहन केलं. तिच्या जागी दुसरं कोणी असतं तर तिने आतापर्यंत आत्महत्या केली असती. पूजा मिश्राने याआधी सलमान खान आणि त्याच्या भावांवर बलात्काराचे आरोप केले आहेत. पुजाचे वडील पद्माकर मिश्रा आयकर विभागात अधिकारी होते.

पूजा मिश्राने आरोप केला आहे की, तिच्या वडिलांनी शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या मित्रांना अनेकवेळा करोडो रुपयांची मदत केली. पण आता हेच लोकं आमच्या मागे हात धुवून लागले आहेत. तिच्या म्हणण्यानुसार, तिचे वडील आणि ‘बिहारी बाबू’ हे चांगले मित्र होते आणि त्यांनी कोट्यवधी रुपयांची मदत केली आहे. अभिनेत्री पुढे म्हणाली की, शत्रुघ्न सिन्हा यांची पत्नी पूनम सिन्हा यांनी माझ्या वडिलांचं ब्रेनवॉश केलं आणि सांगितलं की, बॉलीवूडमध्ये फक्त वेश्याच काम करते.

तिचं म्हणणं आहे की, पूनम सिन्हा यांनी माझा पत्ता कट करुन आपल्या मुलीसाठी जागा बनवण्यासाठी हे सांगितलं होतं. तिचे वडील 2005 मध्ये निवृत्त झाले आणि ते पुण्यात आले आणि तेव्हापासून सिन्हा दाम्पत्याने तिचे पाय खेचण्यास सुरुवात केली. पूजा मिश्राच्या म्हणण्यानुसार, तेव्हा ती व्हिडिओकॉनच्या गेस्ट हाऊसमध्ये राहात होती आणि सिन्हा दाम्पत्य तिच्यावर काळी जादू करत होतं. ”त्यांनी माझे 35 चित्रपट चोरले आहेत. कदाचित ती तिच्यापेक्षा जास्त लोकप्रिय होईल याची त्यांना भीती वाटत होती.

पूजा मिश्रा पुढे म्हणाली की, ”सिन्हा कुटुंब लोभी आणि राक्षसी आहे. ते जबरदस्तीने माझ्या घरात घुसायचे. त्यांनी माझे स्पॉन्सर्स चोरले. मी जेव्हा शत्रुघ्न सिन्हा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेले तेव्हा पूनम सिन्हा यांनी मला काहीतरी खाऊ देवून माझ्यावर काळी जादू केली. 2007-14 पर्यंत मी लाखोंडवाला येथील माझ्या फॅमिली अपार्टमेंटमध्ये राहत होते आणि वर सिन्हा कुटुंब राहत होतं. मी सिंगापूरहून शॉपिंग करून यायचे. हे लोकं माझ्या घरात घुसायचे आणि माझ्या वस्तू चोरायचे आणि सोनाक्षी सिन्हाला द्यायचे”.

”काही दिवसांतच मला वृत्तपत्रात सोनाक्षी सिन्हाचे त्याच कपड्यांमध्ये फोटो पहायला मिळायचे. ती पुढे म्हणाली की, सिन्हा कुटुंबाने तिचे मीडिया कॉल्सही बंद केले आहेत. बेशुद्ध अवस्थेत तिच्यावर देह-व्यापार केला आहे. सोनाक्षी सिन्हा तिची वर्जिनिटी विकून फॅशन डिझायनर बनणार होती. पण ती अभिनेत्री झाली.  शत्रुघ्न सिन्हा यांच्यामुळे मी लग्न केलं नाही. शत्रुघ्न सिन्हा यांनी मला अनेकवेळा ड्रग्ज पाजून माझा गैरफायदा घेतला.”



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *