Headlines

शाहरुख, सलमान आणि ह्रतिक पहिल्यांदाच येणार एकत्र; बॉलिवूडच्या सर्वात मोठ्या चित्रपटाचं शुटिंग सुरु

[ad_1]

‘गदर’, ‘जवान’ यासारख्या सुपरहिट चित्रपटांमुळे बॉलिवूडला पुन्हा एकदा सुगीचे दिवस आले आहेत. यानिमित्ताने पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर अॅक्शन हिरो परतला आहे. यामुळे अॅक्शनपट चित्रपटांची रांगच लागली आहे. यामधील सर्वाधिक उत्सुकता ‘वॉर 2’ चित्रपटाची आहे. यश राज फिल्मसच्या स्पाय युनिव्हर्सचा भाग असणाऱ्या या चित्रपटाचं शुटिंग ऑक्टोबरमध्ये सुरु होणार आहे. दरम्यान या चित्रपटात पहिल्यांदाच शाहरुख, सलमान आणि ह्रतिक एकत्र दिसणार आहे. आयान मुखर्जी या चित्रपटाचं दिग्दर्शन करत असून, भली मोठी स्टारकास्ट झळकणार आहे. 

‘वॉर 2’ हा बॉलिवूडमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा चित्रपट ठरण्याची शक्यता आहे. कारण या चित्रपटात शाहरुख, सलमान, ह्रतिक, दीपिका, कतरिना कैफ, कियारा अडवाणी आणि ज्युनिअर एनटीआर अशी सुपरस्टार्सची रांगच आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘वॉर 2’ चित्रपटाचा मुहूर्त आधीच पार पडला आहे. आयान मुखर्जीने या चित्रपटाचं शुटिंगही सुरु केलं आहे. ह्रतिक रोशन सध्या इटलीत ‘फायटर’ चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यग्र आहे. तेथून परतल्यानंतर तो ‘वॉर 2’ चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात करणार आहे. मधल्या काळात ज्युनिअर एनटीआरही शुटिंगला सुरुवात करण्याची शक्यता आहे. चित्रपटात कियारा अडवाणी मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत असणार आहे. 

टायर, पठाण आणि कबीर येणार एकत्र

सूत्रांच्या माहितीनुसार, वॉर 2 चित्रपट अनेक कारणांसाठी विशेष असणार आहे. आयान मुखर्जी पहिल्यांदाच यशराज स्पाय युनिव्हर्समधील चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. तसंच या चित्रपटातून तीन मेगास्टार पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. वॉर 2 मध्ये टायगर, पठाण आणि कबीर एकत्र दिसतील. 

काही रिपोर्ट्सनुसार, सलमान खान टायगरच्या भूमिकेतून ज्युनिअर एनटीआरला सादर करणार आहे. पण अद्याप याबाबत ठोस अशी माहिती हाती लागलेली नाही. 

‘वॉर 2’ चित्रपट 2025 मध्ये पुढील वर्षी किंवा 2025 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. या चित्रपटासाठी यशराज फिल्म्स सर्वोतपरी प्रयत्न करत आहे. यावर्षी प्रदर्शित झालेल्या पठाण चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. पठाण सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत आहे. जगभरात चित्रपटाने 1000 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *