Headlines

शाहरुख खानच्या चित्रपटाने केला इतक्या कोटींचा टप्पा पार , ‘पठाण’चा जगावर दबदबा

[ad_1]

मुंबई : चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतलेल्या शाहरुख खानला (Shahrukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) चित्रपटाने संजीवनी दिली आहे. ‘पठाण’ चित्रपट पाहण्यासाठी शाहरुखचे चाहते चित्रपटगृहांबाहेर गर्दी करत आहेत. चित्रपट प्रदर्शित होऊन चार दिवस होऊनही मिळणारा प्रतिसाद मात्र कायम आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतात पठाण जास्त कमाई करु शकलेला नसला तरी जगभरात मात्र या चित्रपटाचा बोलबाला आहे. 

पठाणने गाठला 400 कोटींचा टप्पा
चित्रपट समीक्षक रमेश बाला यांनी ट्वीट करत सांगितलं आहे की, 400 कोटींची कमाई केली आहे. पण चित्रपटाने पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी केलेली कमाई पाहता हा आकडा फार कमी आहे. तिसऱ्या दिवसाच्या कमाईत पठाण चित्रपट आमीर खानच्या दंगल, बाहुबली २ आणि केजीएफ२ ला मागे टाकण्यात अपयशी ठरला आहे. 

मात्र शाहरुखच्या चाहत्यांनी नाराज होण्याचं कारण नाही. कारण जगभरात पठाण चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद कायम आहे. रमेश बाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, पठाणने फक्त चार दिवसांत जगभरातील कमाईत 400 कोटींचा टप्पा गाठला आहे. यासह पठाणने आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.  

पठाणने पहिल्या दिवसापासून रचले नवे रेकॉर्ड
पठाण चित्रपटाने पहिल्या दिवशी 54 कोटींची कमाई केली. यासह पठाणने बॉक्स ऑफिसवर नवा रेकॉर्ड रचला आहे. आतापर्यंत कोणत्याही चित्रपटाला इतकी मोठी सुरुवात मिळालेली नाही. दरम्यान जगभरातील कमाईचा आकडा 106 कोटी होता. प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीचा फायदा घेत पठाणने दुसऱ्या दिवशी 70 कोटी कमावले. 

यासह जगभरातील कमाईचा आकडा 235 कोटींवर पोहोचला. चार दिवसात पठाणने 400 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. ट्रेड अॅनालिस्टच्या मते पठाणने अवघ्या 4 दिवसांत जगभरातील बॉक्स ऑफिसवर 400 कोटींची कमाई केली आहे. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने हा आकडा वाढणार आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *