Headlines

Shahrukh Khan Net Worth : बॉलिवूडचा ‘किंग’ खान शाहरूखची एकूण संपत्ती किती? जाणून घ्या

[ad_1]

मुंबई : बॉलिवूडचा बादशाह किंग खान शाहरूख खान (Shahrukh Khan) आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. या वाढदिवसानिमित्त त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. शाहरूखच्या या वाढदिवसानिमित्त त्याची एकूण संपत्ती, आलिशान कार व इतर अनेक गोष्टींची माहिती जाणून घेणार आहोत. 

बंगल्याची किंमत किती? 

शाहरूख खान (Shahrukh Khan Birthday)  त्याच्या मुंबईतल्या मन्नत या बंगल्यात राहतो. या बंगल्याबाहेर शाहरूखच्या वाढदिवसानिमित्त असंख्य कार्यकर्ते जमा होत असतात. बंगल्याजवळ जमुन हे कार्यकर्ते शाहरूखला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतात. दरम्यान शाहरूखच्या (Shahrukh Khan) या मन्नत या बंगल्याची किंमत 200 कोटींहून अधिक आहे.

क्रिकेटमधूनही पैसे कमवतो?

शाहरुख खान (Shahrukh Khan Birthday)  आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मालक आहे. तो अनेक सामन्यांमध्ये संघाला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये दाखल होत असतो. तसेच CPL मध्ये देखील त्याच्या मालकीचा संघ Trinbago Knight Riders आहे. यासोबतच तो लॉस एंजेलिस नाइट रायडर्स आणि अबू धाबी नाइट रायडर्स संघांचा मालक आहे. यामधून देखील तो बक्कळ कमाई करतो. 

शाहरुखची परदेशातील संपत्ती 

रिपोर्टसार, लंडनमधील पॉश एरिया पार्क लेनवर शाहरुख खानचा (Shahrukh Khan Birthday)  सुमारे 172 कोटी रुपयांचा बंगला आहे. यासोबतच दुबईच्या प्रसिद्ध पाम जुमेराहमध्ये अभिनेत्याचा सुमारे 110 कोटींचा बंगला आहे.

आलिशान कार 

शाहरुख खान (Shahrukh Khan) आलिशान कारचा शौकिन देखील आहे. त्याच्याकडे अनेक आलिशान गाड्या आहेत.शाहरुखजवळ असलेल्या बहुतेक वाहनांचा क्रमांक 555  आहे. हा त्याचा लकी नंबर असल्याचे बोलले जाते. त्यांच्याकडे रोल्स रॉयस फॅंटम 8 कार आहे. तसेच कार कलेक्शनमध्ये BMW i8, लँड रेंज रोव्हर स्पोर्ट कारचाही समावेश आहे. त्याच्याकडे मर्सिडीज बेंझ एस क्लाससह अनेक लक्झरी वाहने देखील आहेत. इतकंच नाही तर त्याची स्वत:ची व्हॅनिटी व्हॅन देखील आहे. 

एकूण संपत्ती?

शाहरूख खानच्या (Shahrukh Khan) एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर, तो दरमहा 12 कोटी रुपये कमावतो. मीडिया रिपोर्टनुसार शाहरुख खानची संपत्ती 5 हजार कोटींच्या पुढे आहे.

दरम्यान शाहरूखच्या (Shahrukh Khan) अपकमींग प्रोजेक्ट बद्दब बोलायचे झाले तर, त्याचा पठाण हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.  



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *