Headlines

Shahaji Bapu patil statement on the situation of Shiv Sena during Maha Vikas Aghadi government

[ad_1]

शिंदे आणि ठाकरे गटातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत जाताना दिसत आहे. या वाढत्या संघर्षावर शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी भाष्य केलं आहे. “महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात शिवसेना हळूहळू संपत चालली होती. पक्ष धोक्यात येत होता. येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्ष कमकुवत होईल, अशी भावना मनात येत होती”, अशी विधान शहाजी बापू पाटलांनी केलं आहे.

हेही वाचा- “शहाजीबापू पाटलांनी शिवसेनेशी विश्वासघात…”, भास्कर जाधवांचा हल्लाबोल; म्हणाले, “दोन वर्षात घरी…”

जनतेला दिलेली आश्वासने ‘त्या’ सरकारच्या काळात पूर्ण होत नव्हती

दुसरी बाजू म्हणजे विधानसभेतून निवडून येत असताना संबंधित मतदार संघात जनतेला आपण आश्वासन दिलेलं असतं. मात्र, अडीच वर्षात आम्ही जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यासाठी आम्हाला महाविकास आघाडी सरकारकडून प्रतिसाद मिळत नव्हता, असं म्हणत पाटलांनी नाराजी व्यक्त केली आहे.

काय झाडी, काय डोंगर नंतर शहाजी बापूंचा चकवा व्हायरल

आमचा धंदाच चकवा देण्याचा आहे. चकवा योग्य बसला तर अंगावर गुलाल पडतो. मात्र, चकवा हुकला तर पाच वर्षे घरी बसावं लागतं, हे आमचं दु:ख आहे, असं विधान शिंदे गटाचे शहाजीबापू पाटील यांनी केलं आहे. त्यावर आता शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी शहाजी बापू पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

हेही वाचा- लोकांना पैसे देऊन सभेला बोलावलं? ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर संदीपान भुमरेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

भास्कर जाधवांची शहाजी बापूंवर टीका

“शहाजीबापू पाटील यांना तुम्ही खूप मोठं करून ठेवलं आहे. त्यांचं काय ते वाक्य, काय ते गाणं. ते निष्ठेचं वाक्य आहे का? सहा वेळा निवडणूक लढवून जिंकले नाही. शिवसेना चिन्ह पाठीमागे होते म्हणून निवडून आलेत. त्या शिवसेनेशी विश्वासघात केला आहे. त्यामुळे पाच वर्षात नव्हे तर पुढील दोन वर्षात घरी आहोत, असं त्यांना म्हणायचं असेल,” अशा शब्दांत भास्कर जाधव यांनी शहाजीबापू पाटील यांचा समाचार घेतला.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *