Headlines

‘निवडणूक आयोगाने झुकतं माप दिलं’, ठाकरे गटाच्या आरोपावर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “यांच्या बाजूने….” | Shinde Faction MLA Shambhuraj Desai on Uddhav Thackeray Letter to Election Commission sgy 87

[ad_1]

निवडणूक आयोगाने नाव आणि पक्षचिन्ह वाटपामध्ये विरुद्ध बाजूला झुकतं माप दिल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं असून यामध्ये १२ मुद्दे मांडण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयात पक्षपातीपणा केल्याचा ठाकरे गटाचा आरोप असून कार्यपद्धतीवर ताशेरे ओढण्यात आले आहेत. दरम्यान यानंतर शिंदे गटाचे आमदार शंभूराज देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोग आपल्या कक्षेत राहूनच काम करतं असं ते म्हणाले आहेत.

“तुम्ही शिंदे गटाला मदत केली,’ ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगावर गंभीर आरोप, पत्र पाठवत म्हणाले “आमचे पर्याय तुमच्या वेबसाईटवर…”

ठाकरे गटाचे वकिल विवेक सिंह यांनी निवडणूक आयोगाकडे १२ मुद्द्यांचं एक पत्र सोपवलं आहे. आम्ही निवडणूक आयोगाकडे पक्षाचं नाव आणि चिन्हासाठी दिलेले पर्याय जे जाणुनबुजून वेबसाईटवर टाकण्यात आले. यामुळे शिंदे गटाला आमची रणनीती समजली. अन्यथा दोन्ही दोन्ही बाजूंचे पर्याय सारखेच कसे होते? अशी विचारणा ठाकरे गटाने पत्रातून केली आहे.

शिंदे गटाची प्रतिक्रिया

शंभूराज देसाईंना याबाबत विचारण्यात आलं असता ते म्हणाले “त्यांच्या बाजूने निर्णय लागला की सगळ्या यंत्रणा योग्य आणि विरोधात गेला की आमची माहिती दुसऱ्यांना दिली अशी आरडाओरड करतात. यामध्ये काही तथ्य नाही. निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे. घटनेने, कायद्याने त्यांना अधिकार दिले असून, त्या कक्षेतच राहून ते काम करत असतात. ते अशाप्रकारे माहिती उघड करणार नाहीत”.

“शिंदे साहेब मर्द आहेत, उद्धव ठाकरेंनाच असले बायकी…” लटकेंच्या राजीनाम्यासाठी दबाव टाकल्याच्या आरोपावर शिंदे गट संतापला

ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे ‘त्रिशूळ’, ‘उगवता सूर्य’ आणि ‘मशाल’ असे पर्याय दिले होते. शिंदे गटानेही दिलेल्या पर्यायांमध्ये पहिल्या दोन चिन्हांचा समावेश होता. याशिवाय पक्षाच्या नावासाठी दिलेल्या पर्यायांमध्येही साधर्म्य होते. दोन्ही गटांनी ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ पर्याय दिला होता.

निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला सोमवारी ‘धगधगती मशाल’ हे निवडणूक चिन्ह दिलं होतं. याआधी शिंदे गटाने ‘त्रिशूळ’, ‘उगवता सूर्य’ आणि ‘गदा’ ही तीन पर्यायी चिन्हं आयोगाकडे सादर केली होती. ‘उगवता सूर्य’ हे चिन्ह खुल्या यादीत नव्हते, ‘त्रिशूळ’ आणि ‘गदा’ या चिन्हांना धार्मिक संदर्भ होता. शिवाय, ‘त्रिशूळ’ या चिन्हाचा पर्याय ठाकरे गटानेही दिला होता. त्यामुळे शिंदे गटाने दिलेले तीनही पर्याय आयोगाने फेटाळले आणि मंगळवारी नवे तीन पर्याय देण्यास सांगितलं होतं. त्यानुसार, दिलेल्या चिन्हांमधून आयोगाने शिंदे गटाला ‘ढाल-तलवार’ चिन्हाचं वाटप केलं आहे. तसंच आयोगाने ठाकरे गटाला ‘शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे’ व शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या नव्या पक्षनावांचे वाटप केलं आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *