Headlines

‘Animal चा शेवट पाहून डोळ्यात पाणी आलं, दोनदा चित्रपट पाहिला कारण…’; करण जोहर भावूक

[ad_1]

Karan Johar on Animal : सध्या सगळीकडे रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ ची चर्चा सुरु आहे. त्या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. याच चित्रपटाचं बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरनं कौतुक केलं आहे. त्यामुळे तो सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. त्यानं या चित्रपटाला थेच 2023 चा सर्वश्रेष्ठ चित्रपट असं म्हटलं आहे. याशिवाय त्यानं हा देखील खुलासा केला की त्यानं हा चित्रपट दोन वेळा पाहिला. याविषयी त्यानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे. 

करण Galatta Plus शी बोलताना म्हणाला की, जेव्हा मी सगळ्यांना सांगितलं की, ‘मला ‘ॲनिमल’ आवडला. तेव्हा बरेच लोक आले आणि मला म्हणाले की तू ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ बनवला आहे. जो ‘ॲनिमल’ सारख्या चित्रपटाच्या एकदम विरुद्ध आहे. त्याला उत्तर देत मी म्हणालो, ‘मी तुमच्याशी सहमत आहे कारण मला असं वाटतं की ‘अ‍ॅनिमल’ हा वर्षातील सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे. या निर्णयावर पोहोचायला मला वेळ लागला आणि खूप धाडस करावे लागले, कारण लोकांच्या आसपास असताना असे निर्णय घ्यायला घाबरतो. जसं ‘कबीर सिंग’च्या वेळी घडलं होतं. मलाही तो चित्रपट आवडला. मला असं वाटत होते की मी असे काहीतरी बोलणार आहे, ज्यामुळे मला घाणेरडे दिसावे आणि त्यानं माझी ट्रोलिंग होईल, परंतु आता मला या गोष्टीची पर्वा नाही.’

करण पुढे म्हणाला की, ‘मला ॲनिमलची पटकथा ही दृड्ढ विश्वास असणाऱ्या व्यक्तीवर आधारीत असल्याचे मला कळले. कारण लोकांच्या मनात ज्या शंका आहेत त्या मोडणं, याशिवाय लोकांना जे वाटतं त्या सगळ्या गोष्टी मोडीत पुढे वेगळे विचार आले आहेत. तुम्ही देखील काही विचार करत असतात आणि त्यात मध्येच इंटरव्हल येतो. जिथे हिरो एकटा सगळ्यांशी मारहाण करतो आणि प्रत्येक व्यक्ती गाणं गातायत. तुम्ही असं सगळं कुठे पाहिलं असेल. याला प्रतिभा म्हणतात. ‘ 

हेही वाचा : Chat Leak : ऑरी आणि पलक तिवारीचे जोरदार भांडण, माफी मागूनही दाखवला मिडल फिंगर!

अखेर करण म्हणाला की, ‘चित्रपटाच्या शेवटी दोन लोक एकमेकांशी भांडताना दिसतात आणि गाणं वाजतं तेव्हा मला अश्रू अनावर झालं होतं. पण तिथे फक्त रक्त होतं. या चित्रपटाविषयी अनेक गोष्टी खूप चांगल्या आहेत. हा चित्रपट कोणत्याही सर्वसाधारण माणसाच्या विचारावर नाही आहे. त्यामुळे यातून हे सिद्ध होतं की दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाचे पुढचे विचार आहेत. मी दोन वेळा हा चित्रपट पाहिला, पहिल्यांदा प्रेक्षक म्हणून पाहिला आणि दुसऱ्यावेळी त्याचा अभ्यास करण्यासाठी.’



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *