Headlines

सावित्रीच्या कर्तुत्वान लेकींनी साजरा केला स्त्री शिक्षण गौरव दिन

पुणे /विशेष प्रतिनिधी- आज एक जानेवारी दोन हजार बावीस रोजी मुलींच्या पहिल्या शाळेचा 173वा वर्धापन दिन .या दिवशी मुलींच्या पहिल्या शाळेचा स्थापना दिवस व स्त्री शिक्षण गौरव दिवस साजरा करण्यात आला.

भारतात स्त्री शिक्षणाची पहाट सावित्रीबाई व जोतीराव फुले व फातिमा शेख यांच्यामुळे झाली. समाज करीत असलेला अपमान, वाळीत टाकणे, शेण फेकणे अशा कुठल्याही प्रकारच्या त्रासाला न जुमानता मुलींची शाळा त्यांनी सुरू ठेवली. त्यांच्या प्रयत्नाने 1 जानेवारी 1848 साली मुलींना शिक्षणाची दारे खुली झाली. त्याची सुरवात भिडे वाडा इथे झाली. याचे औचित्य साधून मुलींची 1ली शाळा सार्वजनिक स्मारक निर्माण समितीने 1 जानेवारी 2022 रोजी भिडे वाडा येथे सकाळी 9वा. अभिवादन कार्यक्रम आयोजित केला होता.

गेली 23 वर्ष न चुकता हा कार्यक्रम घेतला जात आहे. विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या सावित्रीच्या लेकींनी स्थापना दिवस व स्त्रीशिक्षण गौरव दिवस साजरा केला .पोलीस उपनिरीक्षक कीर्ती म्हस्के यांच्या हस्ते गौरव फलकाला पुष्पहार अर्पण केला गेला. फुले दाम्पत्याच्या लढ्याची आठवण अभिव्यक्तीच्या तरुण कार्यकर्ते मोनाली चंद्रशेखर अर्पणा, कल्याणी दुर्गा रवींद्र, मंगल निकम, उजमा खान यांनी साऊ पेटती मशाल साऊ आग ती जलाल, सावू शोषितांची ढाल, सावू मुक्तीच पाऊल या गाण्यातून मांडली.

समिती मार्फत १ जानेवारी हा स्त्री शिक्षण गौरव दिन म्हणून साजरा झालाच पाहिजे. अशी मागणीही करण्यात आली. जय सावित्री जय जय फातिमा, साऊ- फातिमाचा इतिहास सर्वांना सांगणार अशा घोषणाही उस्फूर्तपणे देण्यात आल्या.

या प्रसंगी कायद्याचा अर्थ लावणाऱ्या न्यायालयांमध्ये वकील म्हणून कार्यरत करणाऱ्या महिला, अभियांत्रिकी महाविद्यालय शिकवणाऱ्या महिला, देशाच्या मानवी विकास दूत असलेल्या अंगणवाडी ताई चित्रकार महिला अशा विविध क्षेत्रातील महिला, तसेच समितीचे निमंत्रक नितीन पवार,महात्मा फुले प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष एडवोकेट मोहन वाडेकर, रिक्षा पंचायतीचे विजय जगताप, विशाल बागुल, लोकायतचे अजित पेंटरही उपस्थित होते. सुनंदा साळवे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचा समारोप महात्मा फुले रचित अखंडाने झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *