Headlines

सातारा-पुणे महामार्गा वाहनांच्या गर्दीने हाऊसफुल्ल | Traffic jam on Satara Pune highway amy 95

[ad_1]

वाई : दिवाळीच्या सुट्टीत गावी आलेले चाकरमानी पुण्या मुंबईच्या परतीच्या प्रवासाला लागल्याने सातारा-पुणे महामार्गा वाहनांच्या गर्दीने हाऊसफुल्ल झाला.महामार्गावर अनेक किमींच्या रांगा लागल्याने वाहतूक संथ गतीने सुरु होती.साताऱ्यातील सर्व बस स्थानकावरही तुडूंब गर्दी होती.पर्यटक पुन्हा घराकडे वळाल्याने महाबळेश्वर सुरुर रस्ता व पसरणी घाट व खंबाटकी घाट रस्यावर,आनेवाडी टोल नाक्यावर वाहनांच्या दोन्ही मार्गावर मोठ्या रांगा लागल्या होत्या.दिवाळीच्या सलग सुट्ट्या संपल्याने पुणे- बंगळूर महामार्गावर कराड, सातारा खंबाटकी घाट,शिरवळ परिसरात वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे झालेल्या वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. आनेवाडी टोल नाक्यावर वाहनांच्या दहा किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. महामार्गावर मोठी गर्दी होती. खड्ड्यात हरवलेल्या महामार्गावरून व सेवा रस्त्यावरून वाट शोधताना वाहनचालकांची त्रेधातिरपीट उडाली.

वेळे परिसरात खंबाटकी बोगद्यातून जाणाऱ्या रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. पाऊस जास्त प्रमाणात झाल्याने या बोगद्यातून पाण्याचे पाट वाहू लागले आहेत. यामुळेच या बोगद्यातून जाताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. परिणामी महामार्गावर वाहनांची गर्दी वाढून वाहतूक कोंडी झाली होती.खंबाटकी बोगद्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे रविवारी वेळे येथील महामार्गावर दुपारपासूनच भल्या मोठ्या वाहनांच्या रांगा लागायला सुरुवात झाली. या रांगा जवळपास तीन ते चार किलोमीटर पर्यंत वाढल्या होत्या. कासव गतीने बोगद्यातून वाहतूक होत होती. महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या. त्यामुळे परतीच्या मार्गावर असलेल्या चाकरमान्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. तर काही वाहने बंद पडू लागल्याने वाहतूक कोंडीत आणखीच भर पडत होती.प्रत्येक सणासुदीला व सलग सुट्ट्याना महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यावर आल्यावर या समस्या नित्याच्या झाल्या आहेत.

साताऱ्यातील सर्व बस स्थानकावरही तुडूंब गर्दी होती.सातारा शहर व आजूबाजूच्या प्रवाशांनी बस स्थानक फुलून गेले होते.पुणे मुंबईला जाणाऱ्या थांब्यावर मोठी गर्दी होती.पुण्यासाठी दुपारपर्यंत ऐशी बस सोडण्यात आल्या होत्या. मुंबईला जाणाऱ्यांची सर्व बस गर्दीने फुल्ल होत्या.दिवभरात पुणे मुबाईकडे एस टी च्या अडीचशे बस पुणे मुंबईकडे रवाना झाल्या होत्या. गर्दीचा फायदा उठवत खाजगी वाहन धांरकांनी बक्कळ कमाई केली.महाबळेश्वर पर्यटन करून परतीच्या प्रवासाला लागल्याने महाबळेश्वर पाचगणी पसरणी घाट सुरुर महामार्गापर्यंत वाहनांची मोठीच्या मोठी रांग लागली होती.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *