Headlines

Satara A large crowd of citizens West Maharashtra came to the Chief Minister resolve difficulties ysh 95

[ad_1]

वाई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी आपल्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तिसऱ्या दिवशी सताऱ्यासह पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांची त्यांच्या गावी मोठी गर्दी झाली होती. आज तिसऱ्या दिवशी नागरिकांनी आपल्या समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मोठी गर्दी केली. मागील  दोन दिवसांपासून साताऱ्यातील आपल्या मूळ गावी दरे तर्फ तांब (ता महाबळेश्वर)या ठिकाणी आले आहेत.त्यामुळे मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी सकाळ पासूनच कडाक्याच्या थंडीत दरे गावाकडे जाण्यासाठी लोकांची रांग झाली. बामणोली  व तापोळा येथून बोटीतून तसेच काही लोक तराफ्यामधे गाड्या टाकून दरे गावात पोहचले. सकाळ पासून मुख्यमंत्री ही येणाऱ्या सर्व लोकांच्या अडचणी समजून घेत होते. सर्वसामान्य लोकांबरोबरच राजकीय क्षेत्रातील लोकांनीही मुख्यमंत्र्यांकडे आपले प्रश्र्न मांडले. या वेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख उपस्थित होते.

दोन दिवसांपूर्वी आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्या दिवशी पर्यटन विकास संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून सूचना दिल्या.  त्यानंतर दुसऱ्या दिवशी भेटायला येणाऱ्या लोकांची गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाला आदेश देऊन कोणालाही नदीच्या पलिकडे सोडू न देण्याचे आदेश देऊन एक दिवस नेहमीच्या गजबजाटातून एकांतात  घालवला. त्यादिवशी मुख्यमंत्री निवांतपणे आपल्या शेतात रशिवार फेरीय मताना दिसले. गोशाळेतील जनावरांना चारा देणे, स्ट्राॅबेरी लागवड, मत्स्य शेतीतील माशांना खाऊ देण्याबरोबरच हळदीच्या शेतात कोळपणी ही त्यानी केली.

आज तिसऱ्या दिवशी मुंबई ला जायचे असल्याने लोकांना वेळ दिला होता. त्यामुळे लोकांनी तोबा गर्दी केली होती.साताऱ्यातील काही प्रमुख राजकीय नेत्यांनीही त्यांची आज भेट घेतली.दुपार नंतर मुख्यमंत्री सर्व काम आटोपून हेलिकॉप्टरने मुंबई ला खाना झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ओढा कायम आपल्या गावाकडे राहिला आहे. मंत्री असताना ही ते शेतात राबताना दिसले आहेत. आज मुख्यमंत्री असताना गावाकडे येवून त्यांनी स्वतःसाठी व कुटूंबियांसाठी वेळ दिला. पहिल्या दिवशी आल्या आल्या ग्रामदैवत उत्तरेश्वराचे दर्शन घेतले.दुसऱ्या दिवशी पदाचा कोणताही बडेजाव न करता नेहमी प्रमाणे शेतात  शिवारफेरी करत काम केले.तिसऱ्या दिवशी जनतेसाठी वेळ दिला. पर्यटन विकासासाठी मुख्यमंत्री कायम आग्रही दिसत आहेत. साताऱ्यातील पर्यटनासाठी व मोठया तिर्थक्षेत्रांसाठी   निधीची कमतरता भासू देणार नाही असे सांगितले आहे. जिल्हा प्रशासनाने आवश्यक ते प्रस्ताव सादर करून जावली, महाबळेश्वर या दुर्गम तालुक्यासह जिल्ह्याच्या विकासाला गती द्यावी अशी अपेक्षा नागरिकांकडून होत आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *