Headlines

कधी मोलकरीण तर कधी वेश्या…; आईला मिळणाऱ्या भूमिकांवरून संतापली अभिनेत्रीची मुलगी

[ad_1]

Ishita Arjun : बॉलिवूड इंडस्ट्रीवर भेदभावाचे आरोप होतंच असतात. आरोप-प्रत्यारोप  या इंडस्ट्रीसाठी काही नवीन नाही . असेच काही वाद-विवाद पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत आणि यावेळी हे आरोप केले आहेत प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री इला अरुण यांची मुलगी इशिता अरुण हिने, इशिताने  भेदभावाचा हे आरोप बॉलिवूड इंडस्ट्रीवर केले आहेत.  इशिताने सांगितले की, बॉलिवूडने नेहमीच तिची आई इला अरुण यांच्यावर अन्याय केला आहे. एका मुलाखतीदरम्यान तिच्या आईचा अभिनेत्री म्हणून उल्लेख केल्यावर तिने हे वक्तव्य केले. इशिता अलीकडेच हंसल मेहताच्या ‘स्कूप’ या वेब सीरिजमध्ये झळकली होती. 

वेश्या किंवा मोलकरणीचे रोल 
प्रसिद्ध ज्येष्ठ  गायिका इला अरुण तिचा राजस्थानी गाण्यांसाठी प्रसिद्ध आहे.  “रेशम का रुमाल” ‘घागरा घुमियो”, राजा हिंदुस्थानी मधील ”परदेशी परदेशी” हे गाणी आजही लोकप्रिय आहेत. त्यांनी राजस्थानी लोकगायनात प्रसिद्धी मिळवली असून काही चित्रपटांमध्येही त्यांनी अभिनय केला आहे. इला अरुणची मुलगी इशिता अरुण  यादेखील बॉलीवूड अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहेत.  एका मुलाखतीती , इशिताने वक्तव्य केले कि,  की तिची आई गायिकेसोबत एक उत्कृष्ट अभिनेत्री देखील होती, परंतु त्याना अनेकदा वेश्या किंवा मोलकरीण अशा  भूमिका ऑफर केल्या गेल्या. तिचा अभिनयच दृष्टीने हे खूप अन्यायकारक होत. 

लहानपणी आईच्या भूमिकांची खिल्ली उडवणे
इशिताने  संगीतकार ध्रुव घाणेकरसोबत केलं. त्यांचा लग्नाला 18 वर्षे झाली आहेत. इशिताने  अप्लाय लहानपणीच आठवणी सांगताना म्हटले की, “लहानपणी तिच्या आईच्या भूमिकांची अनेकदा खिल्ली उडवली गेली. तिची आई, इला अरुण, एक उत्तम आणि प्रतिभावान अभिनेत्री असूनही, ती काही भूमिकांपुरती मर्यादित होती.” हिंदी आणि उर्दू भाषांचे सखोल ज्ञान असलेल्या त्या प्रतिभावान लेखिका आहेत. इशिताने सांगितले की “इतकी प्रतिभा असूनही तिच्या आईला कमी भूमिका मिळाल्या आणि त्या खूपच कमकुवत होत्या.”

हेही वाचा : ‘या’ अभिनेत्याच्या हसऱ्या चेहऱ्यामागे दडलेलं इतकं दु:ख; अभिनेत्रीवरील प्रेमापोटी तीन लग्न, हाती फक्त निराशा

प्रतिभेपेक्षा शारीरिक स्वरूपाला प्राधान्य
इला अरुणच्या श्याम बेनेगल यांचा चित्रपटात पहिल्यांदा अभिनय केला होता.  मात्र त्यानंतर त्यांना फारशा चांगल्या भूमिका मिळाल्या नाही. . बॉलीवूडमध्ये, टॅलेंट ऐवजी शारीरिक स्वरूपाला जास्त महत्व दिल जातं.  म्हणूनच तिच्या आईला वेश्या आणि मोलकरणीचे रोल  ऑफर केले गेले . इशिता म्हणाली की ओटीटी प्लॅटफॉर्मच्या आगमनामुळे तिच्या आईला तीच टॅलेन्ट दाखवण्याची चांगली  संधी मिळाली आहे. तिची आई अजूनही कार्यरत आहे, त्यामुळे तिच्या निधनानंतर श्रद्धांजली आणि स्मारक उभारण्यापेक्षा तिला भूमिका दिल्या पाहिजेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *