Headlines

संजय राऊतांनी अखेर बंडखोर शिंदे गटावर केलं भाष्य, आईला लिहिलेल्या पत्रात म्हणाले “भुजबळ, राणे सोडून गेले तेव्हा…” | Shivsena Sanjay Raut Letter to Mother Patra Chawl Scam ED Judicial Custody Arthur Road Jail sgy 87

[ad_1]

पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले खासदार संजय राऊत यांनी आपल्या आईला पत्र लिहिलं आहे. न्यायालयीन कोठडीत जाण्याआधी कोर्टाच्या बाहेर बाकड्यावर बसून लिहिलेल्या या पत्रात संजय राऊत यांनी राज्यातील सत्तासंघर्ष, बंडखोर शिंदे गटावर भाष्य केलं आहे. अटक झाल्यापासून प्रसारमाध्यमांसमोर न आलेल्या संजय राऊत यांनी पत्राच्या माध्यमातून पहिल्यांदाच आपली भूमिका मांडली आहे.

“आई, मी नक्कीच परत येईन. महाराष्ट्र आणि आपल्या देशाचा आत्मा असा सहजच कोणाला मारता येणार नाही. देशासाठी लढणारे हजारो सैनिक सीमेवर उभे असतात आणि हे महिनोन महिने घरी येत नाहीत. काही जण तर कधीच येत नाहीत. लढाई तर अशीच असते. मलाही अन्नायापुढे, शिवसेनेच्या म्हणजे महाराष्ट्राच्या दुश्मनांपुढे झुकता येत नाही. अन्यायाविरोधात मी लढा देत आहे. म्हणूनच मला तुझ्यापासून दूर जावे लागते. हा कणखरपणा व कठोरपणा मी तुझ्याकडून घेतला नाही का?,” असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

“बंदुकीचा धाक दाखवत माझ्याविरोधात…” संजय राऊतांचं आईला भावनिक पत्र

यावेळी त्यांनी शिंदे गटाला लक्ष्य केलं. “भुजबळ राणे, शिवसेना सोडून गेले तेव्हाही तुझ्यातला त्रागा मी पाहिलाय. आता पुन्हा शिंदे नावाचा गट फुटून उद्धव ठाकरेंवर हल्ले करु लागला तेव्हा ‘काहीतरी करा, शिवसेना वाचवा!’ असे सांगणारी तूच होतीस. ‘हे लोक का फुटले? यांना काय कमी पडलं होतं?’ असा प्रश्नही तू बातम्या पाहून विचारीत होतीस. शिवसेना वाचवावायची. टिकवायची म्हणजे लढावेच लागेल. प्रत्येक वेळेस वीर शिवाजी शेजाऱ्यांच्याच घरात का जन्माला यावा? हा प्रश्न असतोच,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

संजय राऊतांचं पत्र

खूप वर्ष पत्र लिहिण्याचा प्रसंग आला नाही. रोज ‘सामना’साठी अग्रलेख लिहीत होतो. स्तंभ लिहीत होतो, पण दौऱ्यावर नसेन तेव्हा तू आणि मी रोजच भेटत होतो. दौऱ्यावर असतानाच सकाळ-संध्याकाळ फोनवर बोलत होतो. त्यामुळे तुला सविस्तर पत्र लिहायचे राहून गेले. आता हे पत्र लिहिण्याची संधी केंद्र सरकारने दिली.

शिंदे, भुजबळ, राणे, सोनिया, रोहित पवार अन्… संजय राऊतांनी कोठडीतून आईला लिहिलेलं पत्र जसंच्या तसं

रविवारी (१ ऑगस्ट) ‘ईडी’चे अधिकारी घरी घुसले, तेव्हा तू मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोखाली खंबीरपणे बसून होतीस. तुझ्या खोलीची व देवघराची, तसेच किचनमधील मीठ, मसाले, पिठांच्या डब्यांची झडती घेतली तेव्हाही तू करारी मुद्रेने सर्व सहन करत होतीस. हा प्रसंग आपल्यावर येणारच आहे हे तू बहुधा मनात पक्के केले होतेस. पण संध्याकाळी मला घेऊन जाताना तू मला मिठी मारलीस व रडलीस. तुला अचानक हुंदका फुटला! बाहेर असंख्य शिवसैनिक घोषणा देत होते. त्या गर्जनांतही तुझा हुंदका माझ्या मनात घुसला. ‘लवकर परत ये’ म्हणाली, खिडकीतून मला हात केलास. जसा तू रोज ‘सामना’त किंवा दौऱ्यावर जाताना करतेस. त्या ठीण परिस्थितीतही अश्रू रोखून तू बाहेर जमलेल्या शिवसैनिकांनाही हात केलास. मला घेऊन जाणारी गाडी बाहेर पडेपर्यंत तुझा हात वरच होता.

शिवसेनेचे व स्वाभिमानेच बाळकडू मी तुझ्याकडूनच घेतले. मऱ्हाठी बाणा मी तुझ्याकडूनच शिकलो. शिवसेनेशी व बाळासाहेबांशी कधीच बेइमानी करायची नाही, हे तूच आमच्या मनावर कोरलेस! मग आता त्या मूल्यांसाठी लढण्याची वेळ आली आणि त्यात ‘संजय’ कमजोर पडला, शरण गेला तर बाहेर काय तोंड दाखवू? मी गुडघे टेकलेले तुलाच मान्य झाले नसते. ‘ईडी’,’इन्कम टॅक्स’ वैगेरेच्या भयाने बरेच आमदार-खासदार शिवसेना सोडून गेले. मला बेइमानांच्या यादीत जायचे नाही. कोणीतरी खंबीरपणे उभे राहायलाच हवे. माझ्यात ती हिंमत आहे. ती हिंमत माननीय बाळासाहेब आणि तू दिलीस. सगळ्यांना माहीत आहे, माझ्यावर बनावट व खोटो आरोप लावले. इथे माझ्यासमोर अनेकांकडून दहशत व दबावाने अगदी ‘गन पॉइंट’वर माझ्याविरुद्ध बोगस स्टेटमेंट घेतल्या जात आहेत. अप्रत्यक्षपणे ठाकऱ्यांची साथ सोडा असे सुचवले जात आहे. याच प्रकारचा जुलूम टिळक, सावरकरांसह अनेकांना भोगावा लागला. अनेक शिवसैनिकांनी पक्षासाठी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवले, जायबंदी झाले, प्राण गमावले. मग तोच पक्ष संकटात असताना माझ्यासारख्या त्यांच्या नेत्याने रणांगणातून पळ कसा काढावा? का झुकावे? उद्धव ठाकरे हे माझे जिवाभावाचे मित्र व सेनापती आहेत. अशा कठीण काळात मी त्यांना सोडले तर मी उद्या बाळासाहेबांना काय तोंड दाखवू?

आज कारस्थानी लोकांच्या हाती राजशकट सापडले आहे. त्यांना शिवसेनेचे अस्तित्व व महाराष्ट्राचा स्वाभिमान पायदी तुडवायचा आहे. पडद्यामेगे बरेच काही चालले आहे. अशा वेळी मान खाली घालून, हात बांधून एखाद्या गुलामासारखे कसे जगता येईल? मी आताच ऐकले, ‘नॅशनल हेराल्ड’प्रकरणी सोनिया व राहुल गांधीचाही छळ सुरु आहे. रोहित पवार यांनाही त्रास दिला जातोय. या छळातूनच नव्या क्रांतीच्या ठिणग्या उढतील व नव्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा होईल. लोकशाहीचा पुन्हा जन्म होईल.

जशी तू माझी आई आहेस तशी शिवसेनादेखील आपल्या सगळ्यांची आई आहे. आईशी बेइमानी करण्यासाठी माझ्यावर दबाव होता. सरकारविरुद्ध बोलू नका, महाग पडेल. अशा धमक्या होत्या. हा दबाव आणि धमक्यांना मी घातली नाही या एकाच कारणासाठी मी आज तुझ्यापासून लांब आहे. तरीही चिंता नसावी. मी येईनच, तोपर्यंत उद्धव ठाकरे व असंख्य शिवसैनिक तुझी मुले असतील. काळजी घे!



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *