Headlines

sanjay raut replied to raj thackeray statement on practice to speak alone spb 94

[ad_1]

काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संजय राऊतांवर टीका करताना “राऊतांनी आता एकांतात बोलण्याची प्रॅक्टिस करावी”, असा खोचक सल्ला दिला होता. त्याला आज संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले आहे. काल संजय राऊतांना पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी जामीन मिळाला होता. दरम्यान, आज त्यांनी उद्धव ठाकरेंच्या भेटीला जाण्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधला.

हेही वाचा – “ज्यांनी शिवसेना फोडली, धनुष्यबाण चिन्ह गोठवलं त्यांच्या…”; तुरुंगातून बाहेर पडताच संजय राऊतांचा CM शिंदेंवर हल्लाबोल

काय म्हणाले संजय राऊत?

“मनसे प्रमुख आणि माझे मित्र राज ठाकरे यांनी एका ठिकाणी बोलताना माझ्यावर टीका केली होती. संजय राऊतांवर आता ईडीने कारवाई सुरू केली आहे. त्यांनी आता एकांतात बोलण्याची सवय लाऊन घ्यावी, असे ते म्हणाले होते. मात्र, मला त्यांना एवढंच सांगायचं आहे, की मी कारागृहात एकांतात होतो. वीर सावरकरही तुरुंगात असताना एकांतात होते. लोकमान्य टिळक तसेच आणीबाणीच्या काळात अनेक नेते एकांतात होते. तशीच माझी अटकही राजकीय होती आणि मी माझा एकांतातला काळ सत्कर्मी लावला आहे”, असे प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिले.

हेही वाचा – ‘नाद नाही करायचा, राज्यात आता…’, अफजलखानाच्या कबरीजवळील बांधकामावर कारवाई करताच नितेश राणेंचं ट्वीट

नेमकं काय म्हणाले होते राज ठाकरे?

काही दिवसांपूर्वी मनसेच्या दिवा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन राज ठाकरेंच्या हस्ते करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर राज ठाकरे बाहेर पडत असताना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना संजय राऊतांवर ईडीच्या कारवाई विषयी प्रश्न विचारला होता. त्याचे उत्तर देताना त्यांनी राऊतांना खोचक सल्ला दिला होता. “संजय राऊतांनी आता एकांतात बोलण्याची प्रॅक्टिस करावी” असे ते म्हणाले होते.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *