Headlines

sanjay raut meet on cm eknath shinde meet ssa 97

[ad_1]

कथित पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्याप्रकरणी गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ कारागृहात असलेले शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) नेते, खासदार संजय राऊत यांनी विशेष न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला. आर्थिक गैरव्यवहाराऐवजी केवळ दिवाणी वादाचे प्रकरण असताना संजय राऊतांना अटक करण्यात आली. ही अटक बेकायदा असल्याचे विशेष न्यायालयाने स्पष्ट केलं.

त्यानंतर संजय राऊत यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केलं आहे. “उपमुख्यमंत्री राज्याचं नेतृत्व करत आहेत. मी लवकरच त्यांची भेट घेणार आहे. तसेच, आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटणार आहे,” असेही संजय राऊत यांनी म्हटलं. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही भेटणार का? असा सवाल संजय राऊत यांना विचारण्यात आल्यावर त्यांनी उत्तर दिलं आहे. ते ‘एबीपी माझा’च्या ‘माझा कट्ट्या’वर बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, “माझं काम ज्या खात्याकडे आहे, त्यांना मी भेटेन. शक्यतो मी मंत्र्यांना कमी भेटत असून, आतापर्यंत मंत्रालयात ३ वेळा गेलो. राज्याचे काही प्रश्न असतील तर मी मुख्यमंत्र्यांना भेटेन. बेळगाव सीमाप्रश्नासाठी हजारो लोकांचा मोर्चा निघाला, त्याला महाराष्ट्रातून कोणी गेलं नाही. मागच्या काळात मुख्यमंत्र्याकडे बेळगावबाबतच्या खात्याचं मंत्रीपद होते. ते सांगतात मी सीमाप्रश्नासाठी लाठ्या, काठ्या खालल्या, मग विसरलात का?. सध्याचं सरकार बेकायदेशीर आहे, पण, ते अधिकार पदावर आहेत.”

हेही वाचा : “आत्ता मला रहस्य कळलं की…”, शिंदे गटाच्या १२ खासदारांना संजय राऊतांचं प्रत्युत्तर

“एखाद्याला कायमचं उध्वस्त आणि तुरुंगात पाठवू नये…”

“देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मनात कधीच व्यक्तीगत द्वेष नसून, आम्ही राजकीय भूमिका मांडल्या. मी यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांना आदर्श मानतो. व्यक्तीगत द्वेष ठेऊन राजकारण करत कुटुंबापर्यंत पोहचू नये. एखाद्याला कायमचं उध्वस्त आणि तुरुंगात पाठवू नये, या भूमिका आम्ही जपल्या,” असे संजय राऊत यांनी म्हटलं.

हेही वाचा : “मी तुलना करणारच,” टिळक, वीर सावरकरांचे नाव घेत संजय राऊतांचे मोठे विधान; म्हणाले…

“उपमुख्यमंत्र्यांना भेटू शकत नसेल तर, ही…”

“पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांना दिल्लीत भेटणार आहे. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार आहे. फडणवीस यांनी काही चांगले निर्णय घेतले. तसेच, तुरुंगातील काही कारागृह कर्मचारी आणि कैद्यांचे प्रश्न आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटू शकत नसेल तर, ही कसली लोकशाही,” असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *