Headlines

सानिया मिर्झाच्या नवऱ्यासोबत जोडले होते नाव! आता ‘या’ अभिनेत्रीच्या लग्नाच्या चर्चा

[ad_1]

Ayesha Omar Wedding : 2022 मध्ये पाकिस्तानी अभिनेत्री आयशा उमरचे नाव भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाच्या पती शोएब मलिकसोबत जोडले गेले. अभिनेत्री आयशा उमर आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यावेळी काही प्रसारमाध्यमांनी आयशा उमरसोबतच्या कथित अफेअरमुळे शोएब मलिक त्याची पत्नी भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झासोबत घटस्फोट घेण्याचा विचार करत असल्याची बातमी दिली होती. मात्र, आयशा उमर आणि शोएब मलिक या दोघांनीही नंतर कोणत्याही संबंधांना नकार दिला व आपण केवळ मित्र असल्याचं स्पष्ट केलं. 

आयशा लवकरच लग्नबंधनात अडकणार

नुकत्याच एका दिलेल्या मुलाखतीमुळे आयशा उमर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या अदनान फझलला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत, अभिनेत्रीनं तिच्या वैयक्तिक आयुष्यावर खुलेपणानं चर्चा केली आणि अनेक खुलासे केले. ज्यामध्ये आयशा उमरनं लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. आयशानं सांगितले की ‘ती आता लग्न करण्यासाठी तयार आहे आणि तिला संसार थाटून कुटुंब सुरू करायचं आहे. पती आणि स्वतःची मुले असावीत अशी तिची इच्छा आहे.’ 

आयशा उमरच्या लग्नाच्या प्लॅनिंगबद्दल अधिक माहिती देताना म्हणाली की ‘तिने गेल्या 3-4 वर्षांत स्वतःला तिच्या आयुष्यावर फोकस करण्यासाठी पुरेसा वेळ दिला आहे आणि आता तीला लग्न करण्यासाठी योग्य वेळ असल्याचं तिला वाटतं. तिनं म्हटलं की गेल्या 3-4 वर्षांत तिनं स्वतःसाठी वेळ घेतला आहे आणि आता ती लग्नासाठी पूर्णपणे तयार आहे.’ 

कोण आहे आयशा उमर?

आयशा उमर एक पाकिस्तानी अभिनेत्री, मॉडेल आणि गायिका आहे. आयशा उमरचा जन्म 12 ऑक्टोबर 1981 रोजी लाहोर, पाकिस्तानमध्ये झाला. लोकप्रिय पाकिस्तानी टेलिव्हिजन मालिका ‘बुलबुले’ मधील खूबसुरत या भूमिकेसाठी तिला व्यापक ओळख मिळाली. अभिनयासोबतच आयशा उमर एक प्रतिभावान गायिका देखील आहे. तिनं अनेक गाणी प्रदर्शित केली आहेत आणि विविध प्लॅटफॉर्मवर तिचे गाण्याचे कौशल्य दाखवले आहे. अभिनेत्री आणि गायिका म्हणून तिच्या प्रतिभेमुळे तिचे पाकिस्तानमध्ये खूप चाहते आहेत.

हेही वाचा : 2023 सुपरहिट होण्यासाठी देओल कुटुंबानं केली पूजा? बॉबीनं केला खुलासा

शोएब आणि सानिया मिर्झा यांचा प्रेमविवाह 

पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक आणि भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा यांची 12 एप्रिल 2010 रोजी भारतातील हैदराबाद शहरात पारंपारिक इस्लामिक परंपरेनुसार विवाह केला. विवाह सोहळा पाकिस्तानी आणि भारतीय परंपरांचे मिश्रण होता, विवाह सोहळ्याला जवळचे मित्र, कुटुंबातील सदस्य आणि क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. बॉलिवूड आणि पाकिस्तानमधील अनेक सेलीब्रिटी, नेते आणि खेळाडूंनी या लग्नात हजेरी लावली होती.  ऑक्टोबर 2018 मध्ये सानियाने इझान मिर्झा मलिक नावाच्या मुलाला जन्म दिला.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *