Headlines

सांगलीच्या गोटखिंडीत मशिदीमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना; हिंदू-मुस्लिम ऐक्याचे ४३ वे वर्ष

[ad_1]

सांगलीच्या गोटखिंडी (ता. वाळवा) येथील न्यू गणेश कला, क्रीडा व सांस्कृतिक तरुण मंडळाच्या गणपतीची मशिदीमध्ये प्रतिष्ठापना करण्यात आली. मशिदीमध्ये गणपती स्थापन करण्याचे हे ४३ वे वर्ष आहे. हिंदू व मुस्लिम समाजातील कार्यकर्ते एकत्रित येत गुण्यागोविंदाने गणपती उत्सव साजरा करतात. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून येथील गणेश उत्सवाकडे पाहिले जाते.

प्रत्येक कार्यक्रमात दोन्ही समाजातील युवकांचा सहभाग

झुंजार चौकातील गणपती मंडळाची स्थापना १९८० मध्ये करण्यात आली होती. तेव्हापासून हिंदू- मुस्लिम बांधव एकत्रित येत मशिदीमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना करतात. दहा दिवस धुमधडाक्यात गणपती उत्सव साजरा करतात. आरती, प्रबोधनात्मक कार्यक्रम, महाप्रसाद अशा प्रत्येक कार्यक्रमात दोन्ही समाजातील युवकांचा सहभाग असतो. दरवर्षी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. यावर्षी आष्टा पोलीस स्टेशनचे बीट हवलदार अशोक जाधव यांच्या हस्ते गणपती प्रतिष्ठापना करण्यात आली.

हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येत केली गणपतीची प्रतिष्ठापना

१९८० साली या मंडळाची स्थापना झाल्यानंतर दोन वर्षानंतर मुसळधार पाऊस झाला होता. पावसाचं पाणी गणपतीच्या मुर्तीवर पडू लागलं. त्यानंतर हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येत या गणपतीची मशिदीमध्ये प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून गणपतीची प्रतिष्ठापना मशिदीत केली जाते. १९८५ साली गणपती उत्सव आणि मोहरम एकत्र आल्यामुळे आम्ही दोन्ही सण तेवढ्याच श्रद्धेने साजरे केले असल्याची भावना मंडळाचे संस्थापक अँड. कोकाटे यांनी व्यक्त केली.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *