Headlines

sangli-ncp-leader-rohit-r-r-patil-gets-big-jolt-by-bjp-mp-sanjay-kaka-patil-supporter in-kavathe-mahankal-nagaradhyaksha-election | Loksatta

[ad_1]

सांगली लोकसभा मतदारसंघाचे भाजपा खासदार संजय काका पाटील यांच्या गटाकडून राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित आर. आर. पाटील यांच्या गटाचा पराभव झाला राष्ट्रवादीचे चार नगरसेवक फुटल्यामुळे कवठेमहांकाळ नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपा खासदार समर्थक उमेदवाराचा विजय झाला.

हेही वाचा- “मी लहानपणी पाण्याला फार घाबरायचो, तेव्हा ते मला…”, अजित पवारांनी सांगितली ‘ती’ आठवण!

सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीचे बहुमत असूनही खासदार संजय काका पाटील गटाच्या सिंधुताई गावडे निवडणुकीत विजयी झाल्या. यामुळे राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीकडून राहुल जगताप यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर भाजपा खासदार व विरोधी गटाकडून सिंधुताई गावडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे १० पैकी चार सदस्य फुटले.

हेही वाचा- संजय राऊत यांना दिलासा नाहीच; दसऱ्यानंतर दिवाळीही तुरुंगातच

राहुल जगताप आणि सिंधुताई गावडे यांना प्रत्येकी आठ मते मिळाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चिठ्ठीवर सोडत घेतली. ज्यामध्ये सिंधुताई गावडे निवडून आल्या. त्यामुळे नगराध्यक्ष निवडणुकीत सिंधुताई गावडे यांचा विजय झाला असून राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित आर आर पाटील यांची सत्ता अखेर संपुष्टात आली.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *