Headlines

सांगली : मिरजेतील मटण मार्केटमध्ये दोन गटात जोरदार धुमश्‍चक्री

[ad_1]

मालकी हक्क व विस्तारित गाळ्यात वाट्याला काय येणार? यातून दोन गटात आज (सोमवार) दुपारी मिरजेतील मटण मार्केटमध्ये जोरदार धुमश्‍चक्री माजली. आमदार सुरेश खाडे यांनी नूतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ करून आमदारांची पाठ फिरताच दोन गटात दगड, विटा, हत्यारे, काठ्यांनी मारामारी झाली. अखेर पोलिसांनी सौम्य छडीमार करून वाद आटोक्यात आणला.

हाणामारी प्रकरणी तक्रार दाखल करण्यास कोणीही पुढे आले नसल्याने पोलीसांनीच सरकार पक्षातर्फे दोन्ही गटाविरुध्द सार्वजनिक ठिकाणी गर्दी, मारामारी केल्याची फिर्याद मिरज शहर पोलीस ठाण्यात दाखल केली असल्याचे निरीक्षक सावंत्रे यांनी सांगितले.

शहरात पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर फार जुने मटण मार्केट आहे. आमदार खाडे यांनी मटण मार्केटच्या नूतनीकरणासाठी ६७ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या कामाचा शुभारंभ आमदार खाडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.

तत्पूर्वी या मार्केटमध्ये मिळणारे गाळे आणि मालकी हक्काची जागा या संदर्भात दोन गटांमध्ये वादावादी सुरू होती. उद्घाटनापूर्वी हा वाद आमदार सुरेश खाडे यांच्यापर्यंत पोहोचला होता. तेथे दोन्ही गटाची समजूत काढल्यानंतर अखेर भूमिपूजनाचा कार्यक्रम होऊन लगेचच कामाला सुरुवात झाली. मटण विक्रेते आणि मासे विक्रेते यांची वेगवेगळी दुकाने आहेत.

परिसरात प्रचंड तणाव –

सुरुवातीला बांधकाम मजूर जीर्ण झालेल्या दुकानाची भिंत पाडत असताना मासे विक्रेते आणि मटण विक्रेत्यांचे दोन गट एकमेकांसमोर आले. मालकी हक्काची जागा आणि मटण मार्केटमध्ये आम्हालाच गाळा मिळाला पाहिजे, म्हणून दोन गटात वादावादी सुरू झाली. वादावादीचे रूपांतर तुफान राडेबाजीत झाले. यावेळी काही तरुणांनी दगड विटा घेऊन बांधकाम मजुरांनाही मारहाण करून हाकलून लावले. यावरून पुन्हा जोरात वाद सुरू झाल्याने दोन गट एकमेकांवर तुटून पडले. दिसेल ते हत्यार, काट्या, लोखंडी रॉड, दगडे, विटा घेऊन तुफान मारामारी सुरू झाली. यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला.

मारामारी करणारे तरुण पळून गेले –

मारामारीची माहिती मिळताच शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन सौम्य लाठीमार करत गर्दीला पांगवले. पोलिसांची गाडी येताच मारामारी करणारे तरुण परिसरातून पळून गेले. पोलिसांनी याप्रकरणी एकास ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. सध्या एकाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलीस निरीक्षक राजू सावंत्रे यांनी सांगितले.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *