Headlines

सांगली : घरात घुसणाऱ्या सापाला जेव्हा मांजर रोखते, तेव्हा… | Sangli When a cat stops a snake from entering the house msr 87

[ad_1]

दोन सापातील झुंज, मांगूर मासा आणि साप, साप आणि मुंगुस यांच्यामधील द्वंद्व आपण अनेकदा पाहिले असेल. उंदीर मांजराचा खेळ पाहिला नसेल तर ऐकला असेल. पण साप आणि मांजराच्या झुंज पाहायला मिळणं फारच दुर्मीळ असते. शुक्रवारी सकाळी पलुस तालुक्यातील आमणापूर येथे साप आणि मांजर यांच्यातील खेळाचा प्रकार पहायला मिळाला आहे.

घरात घुसू पाहणाऱ्या सापाला जेव्हा मांजर रोखून ठेवते. त्याला कुठेच जाऊ देत नाही. तेव्हा सापाची झालेली फजिती संदीप नाझरे यांनी आपल्या कँमेरात कैद केली आहे.

नानेटी जातीच्या सापाला जात असताना मांजर त्याला अडवते. मांजर त्याच्या सोबत खेऴण्याचा प्रयत्न करते. ज्या ज्या वेळी मांजर जवळ येईल त्या त्या वेळी साप आपले शरीर आकडून वेटोळे घालून निस्तब्ध पडत होता आणि मांजर कंटाळून जरा बाजूला गेले की पुन्हा तिथून निसटण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होता. मांजर पुन्हा येऊन त्याला पंजाने डिवचत होती. असा प्रकार बराच वेळ सुरू राहिला. सुमारे वीस मिनीटाच्या मांजर व साप यांच्यातील चाललेल्या खेळानंतर सापाची मांजराच्या तावडीतून सुटका करुन कृष्णाकाठी नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले.

एक साप मारला की सात साप निघतात… –

नानेटी सर्पाबाबत प्राणीमित्र मोहसीन सुतार म्हणाले, नानेटी जातीचा बिनविषारी साप आहे. त्यांच्या अंगावर असणाऱ्या केसरी रंगावरून ही मादी असल्याचे समजते. मुख्यत्वे पावसाळ्यात हे साप बघायला मिळतात. या प्रजाती मध्ये मादी पेक्षा नरांची संख्या जास्त असते. या प्रजनन काळात एक मादी निघाली की पाठोपाठ साधारण सात नर मागावर येत असतात. त्यामुळे पुर्वी अशी म्हण होती की , एक साप मारला की सात साप निघतात. ती या नानेटी सापावरूनच असल्याचे मोहसीन यांनी सांगितले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *