Headlines

सांगली : चोरीची दुचाकी घेऊन फिरणारे चोरटे ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे पोलिसांच्या तावडीत | Two wheeler thieves arrested due to vigilance of villagers msr 87

[ad_1]

चोरलेली दुचाकी घेऊन मालकाच्या गावातच पाहुण्यांच्या भेटीसाठी गेलेले, दोन दुचाकी चोरटे आयतेच पोलिसांच्या हाती लागल्याने, “शिकारी खुद शिकार हो गया” असा प्रसंग आटपाडी तालुक्यात घडला.

चोरट्यांनी ज्या व्यक्तीची गाडी चोरली त्याच व्यक्तीच्या गावातील आपल्या पाहुण्यांकडे हे चोरटे तीच चोरीची गाडी १५ दिवसांनंतर घेऊन गेले होते. गावातील चाणाक्ष नागरिकांनी आणि नंतर पोलिसांनी या चोरांच्या हाती बेड्या ठोकल्या.
बाबासाहेब गणपत काटे (वय ६३, रा. पिंपरी खुर्द) हे सेवानिवृत्त जवान १५ दिवसांपूर्वी काही कामानिमित्त दुचाकी (क्र. एमएच १०, यु ६५६२) वरून आटपाडी बसस्थानकात आले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांची दुचाकी लंपास केली. याबाबत त्यांनी आटपाडी पोलिसात गुन्हा नोंद केला होता.

मात्र ज्या चोरट्यांनी दुचाकी चोरली होती ते दोघेही चोरलेल्या दुचाकीवरून आटपाडी तालुक्यातील पिंपरी खुर्द गावात पाहुण्यांकडे आले होते. १५ दिवसांपूर्वी आटपाडी बस स्थानकातुन चोरलेली दुचाकी याच गावातील व्यक्तीची आहे हे त्याना माहित नव्हते. त्यामुळे चोरटे गावात येताच काही नागरिकांनी ती गाडी पाहिली. या गाडीवर विशिष्ट रंगाने काही मजकुर व चित्र काढल्याने गाडी लगेच ओळखली जात होती. गावातील काही लोकांनी जवान काटे यांना त्यांची गाडी गावात कुणीतरी घेऊन आल्याचे सांगितले. त्यानंतर काटे त्याठिकाणी आले आणि त्यांनी चोरट्यांकडे गाडी कोणाची? अशी चौकशी केल्यानंतर ते गोंधळले. त्यातील एकाने जवळच्या डाळिंब बागेत पळून जाण्याचा प्रयत्न केला, तर दुसऱ्या साथीदाराला याची काहीच कल्पना नसल्याने तो नागरिकांच्या तावडीत सापडला.

जमलेल्या नागरिकांनी आटपाडी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. यावेळी पिंपरी खुर्द येथे पोलिसांनी धाव घेत डाळिंब बागेत लपून बसलेल्या चोरास पकडले



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *