Headlines

संगीत विश्वाला आणखी एक धक्का; दिग्गज कलावंताचं निधन

[ad_1]

मुंबई : लोकप्रिय गायक केके (Bollywood Singer KK Death)  यांच्या निधनानंतर आता संगीत विश्वाला पुन्हा धक्का बसणारी घटना घडली आहे. प्रेक्षक आणि संगीतजगत सावरत नाही, तोच एका नावाजलेल्या कालकारानंही जगाचा निरोप घेतल्याचं वृत्त समोर आलं. 

गुरुवारी केके यांच्यावर अंत्यविधी झाल्यानंतर आणखी एका कलाकारानं एक्झिट घेतल्याची बातमी समोर येताच पुन्हा कलाजगत खचलं. संतूर वादक आणि शिक्षक पंडित भजन सोपोरी (Bhajan Sopori Passed Away) यांनी गुरुवारी अखेरचा श्वास घेतला. 

गेल्या बऱ्याच काळापासून गुरुग्राम येथील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण, गुरुवारी मात्र त्यांची आजारपणाशी असणारी झुंज थांबली. 

वयाच्या 74 व्या वर्षी सोपोरी यांनी सर्वांचा निरोप घेतला. पंडितजी, सोपोरी सामापा (सोपोरी अकॅडमी ऑफ म्युझिक एंड परफार्मिंग आर्ट्स) चालवत होते. देशभरातील विद्यार्थ्यांशिवाय ही अकॅडमी कारागृहातील कैद्यांनाही शिक्षण देत होती. 

Bhajan Sopori Passed Away: मशहूर संतूर वादक पंडित भजन सोपोरी का गुरुग्राम के अस्पताल में हुआ निधन

2011 मध्ये या अकॅडमीला जम्मू काश्मीर डोगरी अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलं होतं. सोपोरी यांना भारत सरकारकडून पद्मश्री हा पुरस्कार देण्यात आला होता. जेव्हा एखादी व्यक्ती कलेशी जोडली जाते तेव्हा त्यांची विचार करण्याची क्षमता रचनात्मक होऊन भविष्याच्या योग्य वाटेवर त्यांचा प्रवास सुरु होतो असं त्यांचं म्हणणं होतं. 

सोपोरी यांच्यासारखं व्यक्तीमत्त्वं कलाविश्वातून निघून जाणं ही एक मोठी हानी असल्याचीच प्रतिक्रिया अनेकांनी दिली. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *