Headlines

Sameer Khakhar Passes Away : लोकप्रिय ‘नुक्कड’ मालिकेत कवटीची भूमिका साकरणाऱ्या ‘या’ कलाकाराचे निधन

[ad_1]

Sameer Khakhar: दूरदर्शनच्या ‘नुक्कड’ या लोकप्रिय मालिकेत कवटीची भूमिका साकारून लोकप्रिय झालेले समीर खाखर यांचे निधन झाले आहे. अलीकडेच सतीश कौशिक यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. अशात समीर खाखर यांच्या निधनाच्या वृत्ताने इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. समीर खाखरने छोट्या छोट्या भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. काही काळानंतर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला अलविदा केले आणि अमेरिकेत शिफ्ट झाले होते.

वयाच्या 71 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 

समीर खाखर यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. वैद्यकीय समस्यांशी झुंज देत होते. 14 मार्च रोजी सकाळी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना बोरिवली येथील एमएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान समीर खाखर यांनी वयाच्या 71 वर्षी अखेरचा श्वास घेतला.

वाचा: मानसिक छळ, मारहाण आणि गर्भपात…? समंथा-नागा चैतन्यच्या घटस्फोटाचं खळबळजनक कारण समोर!  

समीर खाखर यांच्या मुलगा गणेश खाखर यांनी सांगितले, मंगळवारी त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर ते बेशुद्ध पडले. आम्ही डॉक्टरांना बोलावले आणि त्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचे सुचवले. त्यावेळीस समीर यांचे हृदय नीट काम करत नव्हते. यानंतर त्यांना लघवीचा त्रास होऊ लागल. त्यांचा शेवटचा काळ बेशुद्धवस्थेत गेला. लघवीचा त्रास झाल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आणि त्यानंतर हृदयाने साथ देणे देखील बंद केले होत.  मल्टिपल ऑर्गन निकामी झाल्याने पहाटे 4.30 वाजता त्यांचा मृत्यू झाला. समीर यांना बोरिवलीच्या एमएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

Sameer Khakhar Death: मशहूर एक्टर समीर खाखर का 71 साल की उम्र में हुआ निधन,  बोरीवली में होगा अंतिम संस्कार - Famous actor Sameer Khakhar passed away,  breathed his last at the

अमेरिकेतून परतल्यानंतर चित्रपटांमध्ये पुनरागमन करते

समीर खाखरने अनेक चित्रपटांमध्ये आपल्या व्यक्तिरेखांनी लोकांना हसवले आहे. काही काळानंतर ते चित्रपटसृष्टी सोडून अमेरिकेत गेले. पण अमेरिकेतून परतल्यानंतर त्यांनी पुन्हा इंडस्ट्रीत प्रवेश केला आणि चित्रपटांव्यतिरिक्त अदालत आणि संजीवनी सारख्या टीव्ही शोमध्ये दिसले. याशिवाय ते Zee5 च्या सनफ्लावर या वेब सीरिजमध्येही दिसले होते. 2020 मध्ये संजीवने नवाजुद्दीनच्या ‘सिरीयस मॅन’ या चित्रपटात राजकारण्याची भूमिका साकारून बरीच प्रशंसाही मिळवली.

1987 मध्ये करिअरला सुरुवात 

1987 मध्ये आलेल्या जबाब हम देंगे या चित्रपटातून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. याशिवाय मेरा शिकार, शहेनशाह, गुरु, नात की आंधी, परिंद अशा अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *