Headlines

Samantha Ruth Prabhu नं ‘पुष्पा 2’ ला दिला नकार?

[ad_1]

Samantha Ruth Prabhu In Pushpa 2 : दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. समंथा ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. गेल्या काही दिवसांपासून समंथा ही तिच्या प्रकृतीमुळे चर्चेत आली होती. आता समंथा एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. दरम्यान, अशी माहिती समोर आली आहे की ‘पुष्पा 2’मध्ये (Pushpa 2) परफॉर्म करण्याची ऑफर समंथानं नाकारली आहे. ‘पुष्पा 2’मध्ये आयटम सॉंगची ऑफर तिला देण्यात आली होती. मात्र, तिनं त्यासाठी नकार दिला. 

समंथानं पुष्पा मधील ‘ऊ अंटावा’ (Oo Antava) हे गाणं प्रचंड व्हायरल झालं होतं. या गाण्यात समंथानं दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता अल्लू अर्जुनसोबत (Allu Arjun) डान्स केला होता. त्यामुळे पुष्पा 2 मध्ये देखील तिचं एकतरी गाणं असेल असे तिच्या चाहत्यांना वाटू लागले होते. या गाण्यातील समंथाचा डान्स आणि तिची चाहत्यांची यादी अजून वाढली आहे. आजही हे गाणं पार्ट्यांमध्ये आपण ऐकतो. मात्र, आता समंथानं गाण्याला नकार दिल्याचे समोर येताच तिच्या चाहत्यांना वाईट वाटलं. 

दरम्यान, आता समंथाच्या टीमनं पुढे येऊन त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. या सगळ्या अफवा आहेत, असे त्यांनी पिंकव्हिलाला दिले आहे. दरम्यान, व्हायरल झालेल्या बातमीनुसार, ‘पुष्पा 2’ चे दिग्दर्शक सुकुमार यांनी समंथाला विचारले असता तिनं चित्रपटाला नकार देत सध्या ती आयटम नंबरसाठी रेडी नसल्याचे म्हटले आहे. मात्र, या सगळ्या अफवा आहेत असे स्पष्ट झाले आहेत. 

हेही वाचा : कॉमेडीतील दोन बाप माणसं येणार एकत्र…, भाऊ कदम आणि ओंकार भोजने प्रेक्षकांना हसवायला सज्ज

दरम्यान, या रिपोर्ट्समध्ये असे देखील म्हटले जात होते की निर्माते समंथाचं मन वळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. इतकंच काय तर तिचं एक छोटं कॅरेक्टर डेव्हलप करण्यात आलं आहे. तर समंथानं ती ऑफर देखील नाकारली आहे. ‘पुष्पा: द राईज’ या चित्रपटात समंथानं तिच्या करिअरमधील पहिलं आयटम सॉंग केलं आहे. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात असलेल्या ‘ऊ अंटावा’ या तीन मिनिटांच्या गाण्यासाठी तब्बल 5 कोटी रुपये मानधन घेतल्याचं म्हटलं जात होतं. या गाण्याची हूक स्टेप आणि समंथाच्या मादक अदांनी प्रेक्षकांची मने जिंकली. ‘पुष्पा: द राईज’ हा चित्रपट तेलुगू, तमिळ आणि हिंदी भाषेत प्रदर्शित झाला. प्रत्येक भाषेतील या गाण्याला तुफान प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदन्ना (Rashmika Mandanna) मुख्य भूमिकेत दिसली होती.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *