Headlines

सलमान खान आणि ऐश्वर्या राय आमने-सामने; पुन्हा एकदा रंगणार दोघांमध्ये…

[ad_1]

Salman Khan : बॉलिवूडमध्ये एका वर्षी अनेक चित्रपट प्रदर्शित होत असतात. काही चित्रपटांचे विषय खूपच चांगले असतात मग अनेकदा एकाच वेळेस जेव्हा 2 चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होतात तेव्हा मोठा प्रश्न मेकर्स पुढे उभा राहतो. पण मात्र प्रेक्षकांची उत्सुकता वाढते. अनेकदा एकाच वेळीस रिलीज होणाऱ्या चित्रपटांमुळे प्रोड्यूसरसमध्ये वाद देखील पाहायला मिळतात. असाच सामना सुपरस्टार सलमान खान आणि त्याच्या एक्स गर्लफ्रेंडमध्ये रंगणार आहे. आणि हा सामना 2023 मध्ये होणार आहे. (Salman Khan and Aishwarya Rai go movies Once again the two will fight nz)

हे ही वाचा – पाकिस्तान अभिनेत्याची इच्छा, आलीयाच्या मुलीला सून करण्याची… सोशल मीडियावर होतोय ट्रोल

आम्ही तुम्हाला सांगत आहोत, एकेकाळी चर्चेत असणारं कपल सुपरस्टार सलमान खान आणि त्याची गर्लफ्रेंड ऐश्वर्या राय यांच्याबद्दल, ज्यांचे चित्रपट 2023 मध्ये आमनेसामने येणार आहेत. सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ आणि ऐश्वर्या रायचा ‘पोनीं सेल्वन 2’ पुढील वर्षी एप्रिलमध्ये रिलीज होणार असून त्यांच्यात संघर्षाची चर्चा सुरू झाली आहे. जेव्हा जेव्हा बॉक्स ऑफिसवर मोठ्या चित्रपटांची टक्कर होते तेव्हा प्रेक्षकांची उत्सुकता वाढते. 

दोन्ही चित्रपट आमनेसामने

हे दोन्ही चित्रपट एका आठवड्याच्या फरकाने प्रदर्शित होणार आहेत. पहिल्या ईदला, 21 एप्रिल 2023 रोजी, सलमान खान स्टारर ‘किसी का भाई किसी की जान’ पडद्यावर येणार आहे. याच्या आसपास कोणताही मोठा चित्रपट येण्याची शक्यता नाही, असे आतापर्यंत मानले जात होते. परंतु ताज्या अहवालांवर विश्वास ठेवला तर, ऐश्वर्या राय स्टारर ‘पोनियिन सेल्वन 2’ पुढील आठवड्यात 28 एप्रिल रोजी या चित्रपटाशी टक्कर देणार आहे. वरवर पाहता, एवढा मोठा चित्रपट अचानक समोर आल्यावर सलमान खानच्या चित्रपटाचे बॉक्स ऑफिसचे गणित बिघडते.

हे ही वाचा – प्रियांका चोप्रानं घालवला लेकीसोबत क्वलिटी टाईम… पाहिलेत का Photo

500 कोटींच्या बजेटमध्ये ‘PS2’

मणिरत्नम दिग्दर्शित, ‘पोनियिन सेल्वन 2’ ची निर्मिती पहिल्या भागाप्रमाणेच सुमारे 500 कोटी रुपयांमध्ये झाली आहे. ‘पोनियिन सेल्वन-1’ ने जगभरातील बॉक्स ऑफिसवर सुमारे 500 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. हे पाहता दुसरा भागही बॉक्स ऑफिसवर कमाल करेल असा विश्वास आहे. चित्रपटात ऐश्वर्या राय व्यतिरिक्त ऐश्वर्या लक्ष्मी, त्रिशा कृष्णन, कार्ती, किशोर, विक्रम आणि शोभिता धुलिपाला यांसारख्या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

हे ही वाचा – रणबीर कपूरच्या एक्स गर्लफ्रेंडमध्ये रंगणार स्पर्धा; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

100 कोटींहून अधिक बजेटमध्ये सलमानचा चित्रपट

सलमान खान स्टारर ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, हा चित्रपट फरहाद सामजीने दिग्दर्शित केला आहे. साजिद नाडियादवाला, नाडियादवाला ग्रँड सन प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटाची निर्मिती 100 कोटींहून अधिक बजेटमध्ये करण्यात आली आहे. या चित्रपटात व्यंकटेश, पूजा हेगडे, जगपती बाबू, राघव जुयाल, जस्सी गिल, शहनाज गिल, सिद्धार्थ निगम आणि पलक तिवारी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *