Headlines

Salaar Twitter Review : ‘याला म्हणतात कमबॅक!’ प्रभासचा ‘सालार’ पाहून नेटकऱ्यांना आठवला ‘बाहुबली’

[ad_1]

Salaar Twitter Review : सध्या सोशल मीडियावर दाक्षिणात्य सूपरस्टार प्रभासची चर्चा सुरु आहे. त्याचा सालार हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची त्याचे चाहते गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा करत होते. आज 22 डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तर सकाळी-सकाळी प्रेक्षकांनी थिएटमध्ये खूप गर्दी केली होती. आता या चित्रपटाला एक्स अकाऊंट म्हणजेच आधीच्या ट्विटर अकाऊंटवर कशी प्रतिक्रिया मिळते हे जाणून घेऊया.  

प्रेक्षकांनी थिएटरमध्ये हा चित्रपट पाहण्यासाठी फक्त गर्दी केली नाही तर त्यासोबत त्यांची प्रतिक्रिया देखील दिली आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला की ‘बाहुबली पुन्हा परतला आहे. कोणत्याही प्रकारचा गोंधळ नसेल आणि फक्त अंगावर येतील काटे.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘काहीही अपेक्षा करू नका, फक्त थिएटरमध्ये जा आणि हा सगळा अनुभव घ्या. काहीही सांगायची गरज नाही. याशिवाय त्या नेटकऱ्यानं साडेतीन स्टार देखील दिले आहेत.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘सालारा ब्लॉकबस्टर चित्रपट आहे. या चित्रपटात असणारे टर्न्स, आणि गुंतागुतीं ही लक्षवेधी आहे. हा एक मास चित्रपट आहे. प्रभासनं अप्रतिम अभिनय केला आहे. पैसा वसून चित्रपट आहेत. तर या नेटकऱ्यानं चित्रपटाला पाच स्टार दिले आहेत. तर हा चित्रपट 2 हजार कोटींची कमाई करणार असं देखील त्यानं म्हटलं आहे.’ आणखी एक नेटकरी म्हणाला की ‘चित्रपट पाहून अंगावर शहारे येतील.’ दुसरा नेटकरी म्हणाला की ‘भारतीय चित्रपटसृष्टीतील हा सगळ्यात मोठं कमबॅक असणार आहे. सगळे रेकॉर्ड मोडणार हा चित्रपट.’ तर एका नेटकऱ्यानं ‘चित्रपट आवडला नसल्याचं म्हटलं आहे. प्रभासचे डायलॉग्स स्पष्ट नाहीत. तिच ती अॅक्शन परत दाखवण्यात आली आहे. VFX तर खूप खराब आहे आणि स्क्रीनप्ले इतका खास नाही.’

हेही वाचा : ‘Ex चा एक्स मित्र’; सलमान आणि अभिषेकच्या त्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट

‘सालार’विषयी बोलायचे झाले तर या चित्रपटात प्रभासशिवाय पृथ्वीराज सुकुमारन, जगपति बाबू आणि श्रृती हासन कलाकार आहेत. या चित्रपटाला भारतात 6 हजार स्क्रिन मिळाल्या आहेत. या चित्रपटाला 12 हजार पेक्षा कमी शो मिळाले आहेत. तर दुसरीकडे काल प्रदर्शित झालेल्या शाहरुख खानच्या ‘डंकी’ चित्रपटाला 4 हजार स्क्रिन मिळाल्या आहेत आणि त्यासोबत 15 हजार पेक्षा जास्त शो आहेत. दरम्यान, इतकं असूनही शाहरुखच्या ‘डंकी’ला प्रभासचा सालार मागे टाकणार असे चित्र पाहायला मिळत आहे. त्याचं कारण म्हणजे चित्रपटाची आगाऊ बूकिंगकडे पाहायचे झाले तर सालारनं 48.94 कोटींचं नेट कलेक्शन केलं आहे. तर चित्रपटाची 2238346 तिकिटं विकली आहेत. तर दुसरीकडे ‘डंकी’ च्या आगाऊ बूकिंगमध्ये 15.41 कोटींची कमाई केली आहे. तर सालारचं बजेट हे 400 कोटींचं आहे असं म्हटलं जातं.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *