Headlines

Video : आता बेडरूममध्ये घुसता का? ‘या’ व्यक्तीवर भडकला Saif Ali Khan

[ad_1]

Saif Ali Khan Scold paps Over coming in his building : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि त्याची पत्नी करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) या दोघांची जोडी ही लोकप्रिय आहे. पापाराझी हे नेहमीच त्यांच्या अवती-भोवती फिरताना दिसतात. त्या दोघांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. दरम्यान, आता सैफ आणि करीनासोबत असं काही झालं आहे. जे कळल्यानंतर तुम्हालाही नक्कीच राग येईल. या व्हायरल व्हिडीओमध्ये पापाराझींवर रागावलेला सैफ त्यांना बोलतो की आता बेडरूममध्ये घुसता का? आता असं काय झालं? असा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेलच…

नक्की काय झालं होतं? 

सैफ म्हणाला की अर्ध्या रात्री 20 पापाराझी कॅमेरा आणि लाइट्स घेऊन आमच्या घरी पोहोचले होते. जसं काय हा त्यांचा हक्क आहे. पण त्यांनी हे खूप चुकीचं केलं आहे. यावेळी त्यांनी सगळ्या हद्द पार केल्या आहेत. प्रत्येकाला त्याची हद्द माहित हवी. आता बेडरूममध्ये घुसता का? दरम्यान, सैफच्या या वक्तव्यानंतर अशी माहिती समोर आली होती की त्यानं त्याच्या घराच्या गार्ड्सला कामावरून काढून टाकलं आहे. 

गार्ड्सला काढून टाकण्याच्या वक्तव्यावर सैफ म्हणाला, “त्यानं त्याच्या गार्ड्सला कामावरून काढून टाकले नाही. कारण त्यात गार्डची काहीच चूक नव्हती. तो कोणाच्याही विरोधात कोणतीही कारवाई करणार नाही. त्याला या सगळ्यांपासून लांब रहायचे आहे.” 

हेही वाचा : Girlfriend च्या घरासमोर Shah Rukh Khan करायचा ते काम, जाणून तुम्हाला ही बसेल आश्चर्याचा धक्का

याविषयी बोलताना सैफ पुढे म्हणाला, “प्रत्येकवेळी आम्ही पापाराझींना सहकार्य करतो आणि आम्ही त्यांना समजूनही घेतो… पण घराच्या बाहेर, गेटच्या बाहेर, असं कोण असं करतं? त्यामुळे मी बेडरूमवर वक्तव्य केलं कारण त्यांनी आधीच सगळ्या हद्द पार केल्या आहेत. आम्ही फक्त इतकंच केलं. लोकांना नक्की काय झालं हे माहितच नाही. प्रत्येकाला काहीना काही विकायचं आहे. आता मी संपूर्ण सत्य सांगितलं आहे धन्यवाद.”

दरम्यान, सैफच्या कामाविषयी बोलायचं झालं तर तो सगळ्यात शेवटी हृतिक रोशनसोबत विक्रम वेधा या चित्रपटात दिसला होता. यानंतर तो ओम राऊतच्या आदिपुरुष या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तो रावनच्या भूमिकेत दिसणार आहे. करीना विषयी बोलायचे झाले तर ती पुढे सुजॉय घोष यांच्या द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्समध्ये दिसणार आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *