Headlines

Sachin Tendulkar : घर नाही महाल म्हणा महाल! सचिन तेंडूलकरचा आलिशान बंगला पाहिला का?

[ad_1]

Sachin Tendulkar Bungalow: सचिन तेंडूलकर म्हणजे भारतीय क्रिकेटचा (Team India) बाहशाह. क्रिकेटचा देव, अशी सचिनची ओळख. भारतीय संघासाठी अफलातून कामगिरी करणाऱ्या सचिनने 2013 साली निवृत्ती घेतली. मात्र, सध्या सुरू असलेल्या लिजांड लिगमध्ये पंन्नाशीमध्ये देखील सचिन आपल्या बॅटची जादू दाखवताना दिसत आहे. (Sachin Tendulkar’s luxurious bungalow in Perry Cross Road Mumbai)

किक्रेटमधून (Cricket) निवृत्ती घेतल्यानंतर सचिन आपला पुर्ण वेळ आपल्या कुटुंबाला देतो. मुंबईमधील सर्वात पॉश एरिया मानला जाणाऱ्या वेस्ट बांद्रामध्ये (West Bandra Mumbai) सचिनचं घर आहे. हे फक्त घर नाही तर स्वप्नांच्या महालच आहे, असं म्हटलं तर वागवं ठरणार नाही. समोर आलेल्या रिपोर्टनुसार, सचिनने हे घर 2007 साली 39 कोटींना खरेदी केलं होतं. त्यानंतर आता तिथेच सचिन त्याच्या कुटुंबासह राहतो.

सचिन आणि अंजलीचं (Anjali Tendulkar) 1995 साली लग्न झालं. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच 1997 साली साराचा (Sara Tendulkar) जन्म झाला. तर 1999 साली अर्जुनचा (Arjun Tendulkar) जन्म झाला होता. सचिनला भारतीय परंपरेचं विशेष आकर्षण आहे त्यामुळे त्याच्या घरात अनेक उत्सव साजरे केले जातात.

सचिनच्या आलिशान बंगल्यामध्ये (Sachin Tendulkar Bungalow) दोन बेसमेंट आहेत. बंगल्याच्या समोरच्या बाजूला एका मोठ्या लाकडाचा दरवाजा दिसून येतो. त्याचबरोबर समोरच्या बाजूला लहान झाडं लावण्यात आली आहेत. त्याठिकाणी संगमरवरची फरशी देखील पहायला मिळते.

सचिनच्या घरातील दिवाणखाना पांढऱ्या आणि तपकीरी रंगाच्या छटांमध्ये रंगवलेला आहे. त्यामुळे उबदार आणि उत्साही भावना निर्माण होते. तर विशिष्ट प्रकारचे सोफे देखील सचिनच्या रूममध्ये पहायला मिळतात. संगमरवराची फरशी चकचकीत दिसून येते. त्यावर एका बाजूला गणपतीची मुर्ती देखील पहायला मिळते.

बंगल्याची एक रूम खास सचिनच्या पुरस्कारांनी भरलेली आहे. सचिनच्या खास आठवणी या रूममध्ये सजवण्यात आल्या आहेत. लिविंग रूमसह डायनिंग एरिया देखील वाढवण्यात आला आहे. सागवान लाकडीचा टेबल आणि सुंदर खुर्च्या दिसतात. अनेकदा जेवण करताना सचिन फोटो शेअर करत असतो.

सचिनची लिविंग रूम देखील सर्वांना प्रभावी करते. अनेक पारंपारिक कला संग्रह लिविंग रूममध्ये पहायला मिळतात. ज्यामध्ये पिवळा, हिरवा आणि काळ्या रंगाच्या कलाकृती पहायला मिळतात. तसेच लाकडी लॅप आणि आलिशान सोफे देखील सजवलेले पहायला मिळतात.

बंगल्यातील एरिया गार्डन सचिनचा सर्वात प्रिय आहे. मोकळ्या वेळेत सचिन नेहमी येथे फेरफटका मारतो. त्याचबरोबर झाडांची मशागत करताना दिसतो. धगधगत्या मुंबईमध्ये असं शांत वातावरण तुम्हाला पहायला मिळणं जवळजवळ अशक्यच म्हणावं लागेल.

बंगल्यामध्ये किचन देखील इटालियन पद्धतीचे दिसून येते. तर  बंगल्यामध्ये जीमची देखील सुविधा आहे. ज्यामध्ये इन्डोर गेम्स खेळता येतात. पेरी क्रॉस रोडवर (Perry Cross Road Mumbai) असलेले हे घर सर्वांना आकर्षित केल्याशिवाय राहत नाही.

आणखी वाचा-



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *