Headlines

RSS dasara melava in Reshimbag Nagpur Mohan Bhagwat Devendra Fadanvis Nitin gadkari were present

[ad_1]

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुरातील विजयादशमी सोहळ्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी मातृशक्तीचा गौरव केला. “पुरुष श्रेष्ठ की महिला हा वाद आम्ही करत नाही. महिलांना घरात ठेवणं योग्य नाही. समाजात दोघांचेही काम परस्परपुरक आहे” असे सरसंघचालक या सोहळ्यात म्हणाले. रेशीमबाग मैदानातील या सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून संतोष यादव या महिलेला स्थान देण्यात आले. विजयादशमी सोहळ्यात सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले. स्वयंसेवकांच्या पथसंचलनाचे सरसंघचालकांनी निरीक्षण केले.

‘‘खोके’वाल्यांचा अधर्म…’, ‘पुढच्या पिढीला कळणारदेखील नाही की, भाजपा…’; दसरा मेळाव्याआधीच उद्धव ठाकरेंकडून हल्लाबोल

नागपुरातील विजयादशमी सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कृपाल तुमाने उपस्थित आहेत. जगात आपल्या देशाचं वजन वाढत आहे. अर्थव्यवस्था, क्रीडा क्षेत्रात भारत लक्षणीय कामगिरी करत असल्याचे यावेळी सरसंघचालक यांनी म्हटले आहे. समाजात मातृभाषा कमी प्रमाणात बोलली जात आहे. भाषेचं जतन करणे आवश्यक असल्याचे सरसंघचालकांनी म्हटले आहे.

दसरा मेळाव्याचा आखाडा ; शक्तिप्रदर्शनासाठी सज्जता: शिवाजी पार्क, बीकेसीकडे सर्वाचे लक्ष

सरसंघचालकांनी देशाच्या लोकसंख्येवरदेखील यावेळी भाष्य केले. लोकसंख्या ही समस्या आहे, मात्र या समस्येचा दोन्ही बाजूंनी विचार व्हायला हवा. या लोकसंख्येचा योग्य उपयोग केल्यास देशाला फायदा होऊ शकतो, असे सरसंघचालक म्हणाले. लोकसंख्या कमी झाल्यास समाज, भाषा संपुष्टात येईल, असेही भागवत यांनी म्हटले आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *