Headlines

Rohit Sharma | रोहितकडून पुन्हा चाहत्यांची निराशा, मुंबईची निराशाजनक सुरुवात

[ad_1]

मुंबई : लखनऊ (Lucknow Super Giants) 90 विरुद्ध 200 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करायला आलेल्या मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) निराशाजनक सुरुवात झाली आहे. कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma) पुन्हा निराशा केली आहे. रोहित आपल्या टीमला पुन्हा चांगली सुरुवात करुन देण्यात अपयशी ठरला आहे. रोहित तिसऱ्या ओव्हरमध्येच आऊट होऊन परतला. त्यामुळे मुंबई अडचणी सापडली आहे. (mi vs lsg ipl 2022 mumbai indians captain hitman rohit sharma out on 6 runs against lucknow super giants at mumbai)

रोहितला आवेश खानने विकेटकीपर क्विंटन डी कॉकच्या हाती कॅच आऊट केलं. आवेश मुंबईच्या डावातील तिसरी ओव्हर टाकायला आला. या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर रोहित कॅच आऊट झाला. रोहितने 7 बॉलमध्ये 1 फोरसह 6 धावा केल्या. 

रोहित या मोसमात आतापर्यंत 6 सामन्यात अपयशी ठरला आहे. रोहितला काही सामन्यात अपेक्षित सुरुवात मिळाली खरी. मात्र त्याला त्याचं मोठ्या आकड्यात रुपांतर करता आलं नाही. रोहितने या मोसमात आतापर्यंत 6 सामन्यात 114 धावा केल्या आहेत. 

मुंबईला या मोसमात आतापर्यंत अपेक्षित आणि चांगली सुरुवात न मिळाल्याने टीमला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यात आता रोहित पुन्हा अपयशी ठरल्याने मुंबई पहिला सामना कसा जिंकणार, असा सवाल या निमित्ताने क्रिकेट चाहते उपस्थित करत आहेत.

 मुंबईला 200 धावांचे आव्हान 

दरम्यान  केएलने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर लखनऊने मुंबईला विजयासाठी 200 धावांचे मजबूत आव्हान दिले आहे. लखनऊने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 199 धावा केल्या. 

लखनऊकडून कॅप्टन केएलने  60 बॉलमध्ये 9 फोर आणि 5 सिक्ससह सर्वाधिक नाबाद 103 धावांची खेळी केली. तर  मनीष पांडेने 38 आणि क्विंटन डी कॉकने 24 धावांचं योगदान दिलं.

मुंबईकडून जयदेव उनाडकटने 2 विकेट्स घेतल्या. तर मुर्गन अश्विन आणि फॅबिएन एलेनने प्रत्येकी 1 विकेट घेतली. 

मुंबई प्लेइंग इलेव्हन :  रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), डेवाल्ड ब्रेविस, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव, किरोन पोलार्ड, फॅबियन एलन, जयदेव उनादकट, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह आणि टाइमल मिल्स.

लखनऊ प्लेइंग इलेव्हन :  केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), मनीष पांडे, दीपक हुड्डा,मार्कस स्टोइनिस, आयुष बदोनी, जेसन होल्डर, क्रुणाल पांड्या, दुष्मंथा चमीरा, आवेश खान आणि रवि बिश्नोई. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *