Headlines

वाईट याचं वाटतं की…; टेस्ट सामना जिंकल्यानंतरही Rohit Sharma ला सतावतेय ‘ही’ गोष्ट

[ad_1]

Rohit Sharma : नागपूरमध्ये खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या (Border–Gavaskar Trophy) पहिल्या सामन्यात टीम इंडियाने (Team India Beat Australi) ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. 5 दिवसांच्या या टेस्ट सामन्यांचा निर्णय अवघ्या 3 दिवसांत लागला आणि टीम इंडियाने या सिरीजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान पहिला टेस्ट सामना भारताने जिंकल्याने चाहते फार खूश आहेत, मात्र दुसरीकडे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) इतक्या मोठ्या विजयानंतर देखील फारसा खूश नसल्याचं दिसून आलं. 

Rohit Sharma ला या गोष्टीचं होतंय दुःख

बॉर्डर-गावसकर ट्रॉफी ज्यावेळी भारतात आयोजित करण्याचं म्हटलं होतं तेव्हापासून ऑस्ट्रेलियाकडून भारतीय पीचवर अनेक आरोप केले जातात. खासकरून नागपुरात खेळल्या गेलेल्या पहिल्या टेस्ट सामन्यात पीचबाबत अशाच प्रकारे अनेक प्रकारचे आरोप करण्यात आले होते. कांगारूंचा असा विश्वास होता की, भारताकडून खेळपट्टीशी छेडछाड केली जातेय. दरम्यान आता पहिला सामना संपल्यावर रोहित शर्मानेही या प्रकरणावर आपले मौन सोडलंय.

भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या म्हणण्यानुसार, सर्वात वाईट बाब ही आहे, ते म्हणजे, खेळाडूंच्या कौशल्य आणि क्षमतेपेक्षा पीचबद्दल अधिक बोललं जातंय. 

इतर भारतीय खेळाडूंनीही घेतलेला आक्षेप

ज्यावेळी ऑस्ट्रेलियाकडून पीचबाबत बोललं गेलं तेव्हा काही भारतीय खेळाडूंनी त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. रवींद्र जडेजाने भारतीय पीचबाबत बोलताना म्हटलं होतं की, जेव्हा आम्ही ऑस्ट्रेलियाला जातो, तेव्हा ते आमच्यासाठी पीचवर गवत ठेवतात. ऑस्ट्रेलियन खेळाडू विमानात बसण्यापूर्वीच पीचबद्दल घाबरले होते. 

टीम इंडियाचा मोठा विजय 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील नागपूर कसोटीचा आज तिसरा दिवस होता. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिल्या कसोटी सामन्यात एक डाव आणि 132 धावांनी पराभव करत 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. भारताने पहिल्या डावात 223 धावांची आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा डाव 91 धावातच संपुष्टात आला. 

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केलेल्या कांगारूंचा पहिला डाव 177 धावात संपवला. त्यानंतर आपल्या पहिल्या डावात 400 धावांचा डोंगर उभारत पहिल्या डावात 223 धावांची आघाडी घेतली.  रवींद्र जडेजा, आर अश्विन  यांच्या फिरकीसमोर ऑसी फलंदाज फ्लॉप ठरले. तर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची घसरगुंडी सुरूच राहिली आणि भारताने अडीच दिवसांत कसोटी जिंकली. भारताने 1 डाव व 132 धावांनी विजय मिळवताना मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *