Headlines

आम्ही सहजा-सहजी जिंकणार…; पहिल्या सामन्यापूर्वीच Rohit Sharma चं धक्कादायक विधान

[ad_1]

BAN vs IND : भारत आणि बांगलादेश (BAN vs IND) यांच्यामध्ये 3 सामन्यांची वनडे सिरीज (ODI Series) खेळवली जाणार आहे. रविवारी म्हणजेच उद्यापासून या सिरीजला सुरुवात होणार आहे. टी-20 वर्ल्डकपमध्ये मिळालेल्या पराभवानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पहिल्यांदाच मैदानावर उतरणार आहे. दोन्ही टीम्समध्ये वनडे सिरीज 2015 साली झाली होती, त्यावेळी 2-1 ने बांगलादेशाने सिरीज जिंकली होती. 

अशातच आता 7 वर्षांनी पुन्हा एकदा सिरीज रंगणार आहे. दरम्यान सामन्याच्या पूर्वसंध्येला कर्णधार रोहित शर्माची प्रेस कॉन्फ्रेंस घेण्यात आली. यावेळी रोहित शर्माने एक मोठी वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाला रोहित शर्मा?

टीम इंडिया बांगलादेशविरूद्ध खेळल्या जाणाऱ्या पहिल्या सामन्याला हलक्यात घेणार नसल्याचं म्हटलंय. बांगलादेशाला हरवण्यासाठी भारतीय खेळाडूंना चांगली कामगिरी करावी लागणार आहे.

प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये रोहित शर्मा म्हणाला की, “नेहमी प्रमाणे ही एक रंजक सिरीज होईल. बांगलादेश एक आव्हानात्मक टीम आहे. त्यांना हरवण्यासाठी आम्हाला चांगला खेळ करावा लागेल. आम्ही बांगलादेशमध्ये येऊन खेळतोय आणि आम्हाला त्यांच्याकडून फलंदाजी, गोलंदाजी आणि फिल्डींग यामध्ये चांगलं आव्हान पहायला मिळणार आहे.”

कसा असेल बांगलादेश दौरा?

पहली वनडे- 4 डिसेंबर, दुपारी 12 वाजता
दूसरी वनडे- 7 डिसेंबर, दुपारी 12 वाजता
तीसरी वनडे- 10 डिसेंबर, दुपारी 12 वाजता
पहली टेस्ट- 14 से 18 डिसेंबर, सकाळी साडे 9 वाजता
दूसरी टेस्ट- 22 से 26 डिसेंबर, सकाळी साडे 9 वाजता

बांग्लादेश दौऱ्यासाठी टीम इंडिया

वनडे टीम: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, सुंदर, शार्दुल ठाकुर , मो. शमी, मो. सिराज, दीपक चाहर, यश दयाल

टेस्ट टीम: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *