Headlines

इतके फोटो काढून काय करणार… फोटो काढणाऱ्या व्यक्तीवर सर्वांसमोर वैतागला Rohit Sharma!

[ad_1]

Rohit Sharma Video Viral: टी-20 वर्ल्डकपनंतर कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) बांगलादेशाच्या (BAN vs IND) सिरीजमध्ये कमबॅक करणार आहे. या दौऱ्यावर रोहित आणि कंपनीला 2 टेस्ट आणि 3 वनडे सामन्यांची सिरीज खेळायची आहे. वनडे सिरीजचा पहिला सामना हा 4 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी रोहित शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तो एअरपोर्टवर फोटो काढल्याबद्दल संतापून पत्रकारांना प्रश्न करतोय. 

Rohit Sharma पत्रकारांवर संतापला?

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा मैदानावरच नाही तर मैदानाबाहेर देखील चर्चेचा विषय असतो. हिटमॅनची एक झलक पाहण्यासाठी लोकं अगदी झुंबड उडवतात. अशातच सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये रोहित शर्माला एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं होतं. यावेळी त्याचे फोटो काढण्यात आले.

मात्र फोटो काढणारा व्यक्ती हा पत्रकार असल्याचं रोहित शर्माला माहित नव्हतं. यावेळी रोहितने थोडं संतापून फोटो काढणाऱ्या व्यक्तीला विचारलं की, इतके फोटो काढून काय करणार?

यानंतर त्या पत्रकारानेही रोहित शर्माला उत्तर दिलं की, सर हे आमचं कामच आहे. यानंतर रोहित देखील छोडा नरमला. शिवाय फोटो काढून निघून गेला.

टी-20 वर्ल्डकपनंतर मैदानात उतरणार रोहित

ऑस्ट्रेलियामध्ये खेळल्या गेलेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये इंग्लंडकडून दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं. यानंतर रोहितला न्यूझीलंडविरूद्धच्या सिरीजमध्ये आराम देण्यात आला. टी-20 वर्ल्डकपमध्ये रोहित शर्माला साजेशी अशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे आताच्या सिरीजमध्ये त्याच्या खेळावर सर्वांचं लक्ष असणार आहे.

कसा असेल बांगलादेश दौरा?

  • पहली वनडे- 4 डिसेंबर, दुपारी 12 वाजता
  • दूसरी वनडे- 7 डिसेंबर, दुपारी 12 वाजता
  • तीसरी वनडे- 10 डिसेंबर, दुपारी 12 वाजता
  • पहली टेस्ट- 14 से 18 डिसेंबर, सकाळी साडे 9 वाजता
  • दूसरी टेस्ट- 22 से 26 डिसेंबर, सकाळी साडे 9 वाजता

बांग्लादेश दौऱ्यासाठी टीम इंडिया

वनडे टीम: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, सुंदर, शार्दुल ठाकुर , मो. शमी, मो. सिराज, दीपक चाहर, यश दयाल

टेस्ट टीम: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *