Headlines

Rohit pawar told about what to learn from sharad pawar spb 94

[ad_1]

नुकताच ‘द इंडियन एक्सप्रेस’ने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील विविध मुद्द्यांसह सद्याच्या राजकीय परिस्थितीवरही भाष्य केलं. दरम्यान, ‘आजोबांकडून तुम्ही काय शिकला आहात?’ असा प्रश्न विचारताच त्यांनी शरद पवारांचे कौतुक करत ते कठीण प्रसंगांमध्ये शांत असतात हा त्यांच्यातील सर्वात महत्त्वाचा गुण शिकण्यासारखा असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा – “शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याचा डाव,” रोहित पवारांचा मोठा दावा, म्हणाले “पवार कुटुंबात मतभेद…”

नेमकं काय म्हणाले रोहित पवार?

”शरद पवार कठीण प्रसंगांमध्ये शांत असतात. कारण त्यावेळी ते कठीण प्रसंगांवर मात कशी करायची याचा विचार करत असतात. हा त्यांचा सर्वात महत्त्वाचा गुण आहे. त्यांना आव्हानात्मक कामं आवडतात, त्यामुळे त्यांना कोणी आव्हान दिलं तर त्यांच्यातली उर्जा प्रचंड वाढते. प्रत्येकाला मदत करणे, त्यांची कामे करून देणे, या त्यांच्या स्वभावातून मी खूप काही शिकलो आहे, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली.

हेही वाचा – ‘पवार कुटुंबात मतभेद निर्माण करुन पक्ष फोडण्याचा डाव’, रोहित पवारांच्या दाव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले “त्याला मी…”

इतर पक्षातील लोकं केवळ ओळखीच्या लोकांना मदत करतात. शरद पवार यांचा तसा स्वभाव नाही. ते प्रत्येकाला मदत करतात. माणसं कशी जपायची, ही त्यांच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे, अशी असेही ते म्हणाले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *