Headlines

Rishabh Pant: भारताला मोठा धक्का! ऋषभ पंत ऑस्ट्रेलिया मालिकेतून बाहेर? ‘या’ 3 मधून कोण होणार विकेटकीपर?

[ad_1]

Rishabh Pant Car Accident:  टीम इंडियाचा (Team India) स्टार फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) याच्या कारचा भीषण (Car Accident) अपघात झाला. आगीने खाक झालेल्या गाडीमधून ऋषभ थोडक्यात बचावला आहे. ऋषभ पंतच्या भीषण अपघातानंतर आता त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर क्रिकेटप्रेमींनी तो लवकर बर व्हावा आणि मैदानावर पुनरागमन करावं अशी प्रार्थना केली आहे. मात्र यावर डॉक्टरांनी पंतला पूर्ण तंदरूस्त होण्यासाठी काही महिने लागतली असं म्हटलं आहे. 

तसेच ऋषभ पंतला (Rishabh Pant)  लीगामेंटच्या दुखापतीतून सावरण्यासाठी किमान तीन ते सहा महिन्यांचा कालवधी लागेल. परिणामी आगामी ऑस्ट्रेलियाविरूध्दची मालिका आणि आयपीएल 2023 (Ipl 2023) मध्ये खेळू शकेल की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.  यामुळे टीम इंडियाला मोठा धक्का बसू शकतो. पण टीम इंडियामध्ये अनेक युवा खेळाडू आहेत, जे कसोटी सामन्यांमध्ये पंतच्या जागी खेळू शकतात.

या खेळाडूंमध्ये युद्ध रंगणार 

भारतीय कसोटी यष्टीरक्षकाच्या जागेची घोडदौड सुरू होईल आणि या कसोटीत केएस भरत (KS Bharat), दुसरा यष्टीरक्षक उपेंद्र यादव (Upendra Yadav) आणि इशान किशन (Ishan Kishan) या तीन खेळाडूंपैकी कोण खेळणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. 

ऑस्ट्रेलियाचा भारतात 9 फेब्रुवारी पासून 22 मार्चपर्यंत दौरा असणार आहे. यात चार कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने होणार आहेत. ऑस्ट्रेलियाचा दौरा संपल्यानंतर आयपीएलचा 16 वा हंगाम होणार आहे. आयपीएल (IPL) मार्चच्या अखेरीस किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरू होऊ शकते. 

हे खेळाडू उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत

नवीन निवड समितीकडे 3 पर्याय असतील. एकतर भारत-अ चे 2 यष्टीरक्षक केएस भरत आणि उपेंद्र मुख्य संघात सामील होतील किंवा स्फोटक यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन संघात स्थान मिळवेल. केएस भरत उत्कृष्ट फॉर्ममध्ये धावत आहे. यापूर्वी अनेक दौऱ्यांवर तो टीम इंडियाचा भाग राहिला आहे. त्याचे यष्टिरक्षण कौशल्यही अप्रतिम आहे. त्याने आयपीएलमध्ये आरसीबी संघाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. 

डेहराडूनमध्ये उपचार सुरू

शुक्रवारी सकाळी दिल्लीहून रुरकीला जात असताना ऋषभ पंत यांचे मर्सिडीज कारवरील नियंत्रण सुटले आणि त्यामुळे ती दुभाजकावर आदळली. त्याच्यावर मॅक्स डेहराडून येथे उपचार सुरू आहेत. जरी एक्स-रे आणि सीटी स्कॅनमध्ये फ्रॅक्चर, मेंदू आणि पाठीच्या कण्याला दुखापत झाली नसली तरी, त्याच्या गुडघा आणि घोट्याच्या अनेक अस्थिबंधन अश्रूंमुळे तो निश्चितपणे जखमी झाला होता. तो बराच काळ बाहेर असेल आणि ही वेळ दोन ते सहा दरम्यान असू शकते.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *