Headlines

Rishabh Pant Accident: ही काय पहिलीच वेळ नाही; ओव्हरस्पीडमुळे यापूर्वीही पंत आलेला गोत्यात!

[ad_1]

Cricketer Rishabh Pant News: भारताचा दिग्गज क्रिकेटर ऋषभ पंतचा (Rishabh Pant) भीषण अपघात झाला. पंतची गाडी रस्त्याच्या डिव्हायडरला आदळली. यावेळी पंतची गाडी पूर्णपणे जळून खाक झाली. या अपघात पंत गंभीर जखमी (Rishabh Pant Injured) देखील झाला आहे. गाडी चालवताना पंतला डुलकी लागली आणि त्याचं गाडीवरील नियंत्रण सुटलं. मात्र नुकतंच गेल्या काही दिवसांमध्ये भरधाव वेगाने गाडी चालवल्याने उत्तर प्रदेशात एकदा नाही तर दोन वेळा पावती फाडण्यात आली आहे. 

उत्तर प्रदेश पोलिस वाहतूक संचालनालयाने ऋषभ पंतला चलनाची रक्कम भरण्यासाठी नोटीस देखील पाठवली असल्याचं समोर आलं आहे. 22 फेब्रुवारी 2022 रोजी रात्री 11:30 वाजता ऋषभ पंतच्या मर्सिडीज कारने (DL10CN1717) वाहतूक नियमांचे उल्लंघन केलं होतं. भरधाव वेगाने जाणारी पंतची कार रस्त्यावर लावलेल्या कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली होती. या संदर्भात पंत यांना कायद्यांतर्गत 200 रुपयांचे चलान पाठवण्यात आलेलं. अजून हे चलान पेंडिंग आहे. 

याशिवाय 25 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता पंतच्या याच कारने पुन्हा वेगमर्यादेचं उल्लंघन केलं असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर पुन्हा गाडीचा मालक पंतला 2000 रुपये दंड भरण्याची नोटीस पाठवण्यात आली. यूपी सरकारच्या परिवहन विभागाच्या म्हणण्यानुसार, सध्या दोन्ही चलानच्या दंडाची रक्कम भरण्यात आलेली नाही. 

कसा झाला अपघात?

दिल्लीवरून घरी परतत असताना पंतची कार रेलिंगला धडकली आणि हा अपघात झाला. रेलिंगला धडक दिल्यानंतर गाडीने पेट घेतला आणि काही वेळातच पंतची गाडी जळून खाक झाली. मुख्य म्हणजे ऋषभ पंत स्वतः गाडी चालवून त्याच्या घरी जात होता. यावेळी त्याला डुलकी लादली आणि गाडीचा अपघात झाला. 

बस ड्रायव्हरने वाचवला पंतचा जीव

सुशील कुमार या बस ड्रायव्हरने पंतचा जीव वाचवला. यावेळी एका वेबसाईटशी बोलताना सुशील कुमार यांनी सांगितलं की, “मी हरियाणा रोडवेजचा ड्रायव्हर असून हरिद्वारला जात होतो. यावेळी दिल्लीकडे जाणारी एक गाडी 60-70 च्या स्पिडने डिव्हायरला आदळली. ती गाडी आम्हाला टक्कर देणार असल्याचं लक्षात आल्यावर मी त्वरित गाडी फर्स्ट लाईनमध्ये काढली.” 

बस ड्रायव्हरने पुढे सांगितलं की, त्यानेच आम्हाला सांगितलं की, तो ऋषभ पंत आहे. त्याचे पैसे देखील पडले असल्याचं त्याने सांगितलं. त्यावेळी आम्ही आसपास पडलेले 7-8 हजार रूपये एकत्र करून त्याला दिले. यावेळी माझ्या कंडक्टरने अ‍ॅम्ब्युलन्सला फोन केला. 15-20 मिनिटांत अ‍ॅम्ब्युलन्स आली आणि आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये पाठवून दिलं. तो पूर्णपणे रक्तबंबाळ झाला होता आणि लंगडत चालत होता. आम्हाला त्यावेळी व्हिडीओ काढण्यापेक्षा त्याचा जीव वाचवणं जास्त महत्त्वाचं वाटलं.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *