Headlines

Dhania Ke Upay: इवलेसे धने दूर करतील दारिद्र्य; घरात कायम नांदेल लक्ष्मी

[ad_1]

Coriander Remedies: प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या भूमिका बजावतात. यामध्ये ग्रहांची दशा आणि स्थिती अतीशय महत्त्वपूर्ण असते. अनेकदा राशीत असणाऱ्या ग्रहांच्या स्थितीमुळं काही व्यक्तींना त्याचा फायदा होतो तर काही व्यक्तींना त्यापासून होणाऱ्या वाईट परिणामांना सामोरं जावं लागतं. ज्योतिषविद्येमध्ये (Astro) यासंबंधीची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. इथं काही असेही उपाय सांगण्यात आले आहेत जिथं तुम्हाला अनेक समस्यांवरील तोडगे सांगण्यात आले आहेत. (Dhania Ke Upay Coriander Remedies for money wealth and happiness)

 

तुम्हाला माहितीये का घरातील लहानसहान गोष्टी, वस्तूसुद्धा तुमच्या अनेक अडचणींवरील उपाय ठरू शकतात. फक्त त्या गोष्टींचा अपेक्षित वापर तुम्ही करा म्हणजे झालं. घरात असणाऱ्या पैशांच्या तंगीवरही असाच एक सोपा उपाय आहे. ज्यासाठी घरातल्या एखाद्या डब्यात असणारे इवलेसे धने मदत करतील. 

उधार दिलेले पैसे परत मिळतील 

गरजेच्या वेळी तुम्ही कुणाला पैसे उधार दिले असतील आणि कितीही प्रयत्न करुनही त्या व्यक्तीनं तुमचे पैसे परत घेतले नसतील तर तुम्ही कोणत्याही शुक्रवारी एक कागद घ्या, त्यावर ज्या व्यक्तीला पैसे दिले आहेत त्याचं नाव लिहा त्यावर धन्याचे दाणे ठेवा आणि कागदाची पुडी बांधा. आता ही पुडी नदीच्या वाहत्या प्रवाहात सोडा. पैसे परत मिळतील. 

गृहक्लेश दूर करणार धने 

तुमच्या कुटुंबात सतत वाद, मतभेद असतात का? असं असल्यास तुम्ही धने घराच्या पूर्वेला ठेवून हनुमान चालिसा पठण करा. असं केल्यानं सर्व वाद मिटतील. 

आर्थिक चणचण नष्ट होईल 

प्रचंड कमाई करूनही तुम्ही जर पैसे साठवण्यात अपयशी ठरत असाल आणि महिनाअखेरीस तुमच्याकडे काहीच पैसे उरत नसतील तर, प्रत्येक बुधवारी गाईला धने खायला द्या. अशी मान्यता आहे की असं केल्यामुळं घरातील पैशांची चणचण संपते, घरात कायम लक्ष्मी नांदते. 

लक्ष्मीची कृपा हवीये? 

आपल्या घरात कायम लक्ष्मी नांदावी असं प्रत्येकालाच वाटतं. तुमचीही अशीच इच्छा असेल तर शुक्रवारी एका लाल रंगाच्या कापडामध्ये धने आणि एक चांदीचं नाणं ठेवून हे लक्ष्मीला अर्पण करा यानंतर लक्ष्मीच्या मूर्तीची आणि त्या पुरचुंडीचीही पूजा करा ज्यामध्ये धने आणि नाणं आहे. पुजेनंतर कापडासहीत धने आणि नाणं तिजोरी किंवा तुमच्या धन- दागिने ठेवण्याच्या ठिकाणावर ठेवा. 

(वरील माहिती सर्वसामान्य गृहितकांवर आधारित आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही. ) 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *