Headlines

‘रात्रीचे १ वाजले तरी फटाके वाजवतायत’, पोलिसांकडे तक्रार करणाऱ्या मुस्लिमांना मनेसेने सुनावलं, म्हणाले “तुमची भोंग्यावरील अजान…” | MNS Manoj Chavan Tweet Diwali Firecrackers Masjid Loudspeaker Mumbai Police sgy 87

[ad_1]

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पुन्हा एकदा मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. मनसेचे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी केलेल्या ट्वीटमुळे हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुंबई पोलिसांकडे रात्री फटाके वाजत असल्याने तक्रार करणाऱ्या काही मुस्लीम व्यक्तींच्या ट्वीटवर व्यक्त होताना त्यांनी ‘दिवाळी असल्याने सहन करा’ असा सल्ला दिला आहे. तसंच ‘तुमची भोंग्यावरील अजान आजही सुरु आहे’ याची आठवणही करुन दिली आहे.

नेमकं काय झालं?

ट्विटरला एका मुस्लीम व्यक्तीने पोलिसांना टॅग करत रात्रीच्या वेळी फटाके वाजत असल्याची तक्रार केली होती. सलमान खान नावाच्या व्यक्तीने रात्रीचे दोन वाजले तरी कांदिवलीतील गणेश नगर येथे फटाके फोडले जात असल्याचं ट्वीट करत पोलिसांकडे कारवाईची मागणी केली होती. तर दुसऱ्या एका ट्वीटमध्ये केनिल नावाच्या व्यक्तीने पहाटे ४.३० वाजता फटाके फोडले जात असल्याची तक्रार केली होती. मुंबई पोलिसांनी या दोन्ही ट्वीटरला उत्तर देत संबंधितांना कळवण्यता आल्याचं सांगितलं होतं.

दरम्यान मनोज चव्हाण यांनी या ट्विटचे स्क्रीनशॉट शेअऱ केले असून त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “विचार करा मग आम्हाला भोंग्यांचा रोजचा किती त्रास होत असेल. आज तुम्हाला आमच्या फटाक्यांचा त्रास होत आहे. आम्ही रोज फटाके फोडत नाही, मात्र तुमची अजान अजूनही अनेक ठिकाणी भोंग्यावर सुरू आहे. थोडं सहन करा कारण दिवाळी आहे,” असं ते म्हणाले आहेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *