Headlines

रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटनंतर, महिला खासदारचा बोल्ड व्हिडीओ व्हायरल

[ad_1]

मुंबई : अभिनेत्री या नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. कधी अभिनयामुळे तर कधी त्यांनी परिधान केलेल्या कपड्यांमुळे. त्यांचे फोटो तर नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. दरम्यान, नुकतेच अभिनेता रणवीर सिंगचे न्यूड फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या सगळ्यात पश्चिम बंगाल तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि बंगाली चित्रपट अभिनेत्री नुसरत जहाँ त्यांच्या बोल्डनेसमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरल्या आहेत.

नुसरत जहाँ या नेहमीच चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहेत. आज नुसरत यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. अभिनयापासून राजकारणापर्यंत नसूरत यांनी मोठं नाव कमावलं आहे. पण या सगळ्याशिवाय नसूरत त्यांच्या बोल्डनेसमुळेही चर्चेत असतात. नुसरत या सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्या नेहमीच फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात. यावेळी त्या पुन्हा एकदा ट्रोलिंगच्या निशाण्यावर आल्या आहेत. 

टीएमसी खासदार नुसरत जहाँ यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ एका ज्वेलरी ब्रँडच्या प्रमोशनचा आहे. या व्हिडीओत नुसरत यांनी अतिशय बोल्ड ड्रेस परिधान केला आहे. नुसरत यांनी गुलाबी रंगाचा ट्यूब टॉप आणि स्कर्ट परिधान केलं आहे. नुसरत यांचा हा ड्रेस सुंदर दिसत आहे. 

या व्हिडीओत नुसरत या सतत त्यांचा ड्रेस फिक्स करताना दिसत आहे. पण त्यांचा हा लूक चाहत्यांना फारसा आवडलेला नाही. नुसरत जहाँचा हा लूक अनेक चाहत्यांना आवडला आहे. त्यामुळे अनेक चाहते त्यांना ट्रोल करताना दिसत आहेत. यावर कमेंट करताना एक नेटकरी म्हणाला, ‘नुसरत फक्त टॉवेलमध्ये आहे.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘तुम्ही खासदार आहात, विसरलात का?’ अशा अनेक कमेंट्स नुसरत यांच्या या व्हिडिओवर येत आहेत.

२०१९ मध्ये निखिल जैनसोबत लग्नगाठ बांधली

अभिनेत्री नुसरत जहाँ यांनी २०१९ मध्ये निखिल जैनसोबत तुर्कीमध्ये लग्न केले होते. त्यांनी केलेल्या आंतरधर्मीय विवाहामुळे देखील त्यावेळी बऱ्याच चर्चेत आल्या होत्या. पण लग्नाच्या वर्षभरातच दोघांमध्ये खटके उडू लागले आणि अखेर त्यांनी हे लग्नच अमान्य असल्याचे सांगितले. त्यामुळे याची चर्चा संपूर्ण देशभरात रंगली होती.

नुसरत जहाँ नोंदणी पद्धतीने विवाह करण्यासाठी नकार देत होत्या, असे निखिल जैन याने सांगितले होते. ऑगस्ट 2020 पासून त्यांच्या वागण्यात अचानक बदल झाला आणि नोव्हेंबरमध्ये त्या घर सोडून गेल्या असल्याचे देखील निखिल जैनने सांगितले होते. त्यानंतर त्या अभिनेता यश दासगुप्ताला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. नुसरत जहाँ यांनी 26 ऑगस्ट रोजी एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्यांनी मुलाचे नाव इशान जे दासगुप्ता ठेवल्याचे म्हटले जाते. इशानच्या जन्म दाखल्यावर वडिलांचे नाव देबाशिस दासगुप्ता असं लिहिण्यात आले होते. देबाशिस हे यश दासगुप्ताचं खरं नाव आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *