Headlines

रणवीर सिंग पाठोपाठ ‘या’ अभिनेत्रीने शेअर केला न्यूड फोटो , सोशल मीडियावर चर्चांना उधाण

[ad_1]

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग नेहमीच त्याच्या हटके कपड्यांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतो. पण यावेळी न्यूड फोटोशूटचे फोटो शेअर करत त्यांना सगळ्यांना आश्चर्यचकित केलं आहे.  त्याच्या या फोटोशूटवर फक्त चाहते नाही तर सेलिब्रिटीही त्यांचे प्रतिक्रिया देत आहेत. एवढंच काय तर त्याच्या या फोटोशूटवरून अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे अनेकांनी रणवीरला सोशल मीडियावर ट्रोल केलं आहे. दरम्यान, एकीकडे रणवीरच्या फोटोशूटची चर्चा सुरु असताना, दुसरीकडे एका अभिनेत्रीने तिच्या वाढदिवसाच्या दिवशीचं न्यूड फोटोशूट शेअर केला आहे. 

हॉलिवूड अभिनेता ब्रूस विलिस आणि अभिनेत्री डेमी मूर यांची मुलगी स्काउट विल्सने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिचा हा न्यूड फोटो शेअर केला आहे. स्काउटनं नुकताच तिचा 31 वा वाढदिवस साजरा केला आहे. स्काउटनं शेअर केलेल्या या फोटोत ती डोंगरात असलेल्या एका ठिकाणी गेल्याचे दिसत आहे. स्काउटला तिचा हा वाढदिवस निसर्गाच्या सानिध्यात साजरा करायची इच्छा असल्याचे यातून कळतं. स्काउट एका बाथटबमध्ये असून तिने तिचा न्यूड फोटो शेअर केला आहे. 

स्काउटनं या फोटोत तिचा चेहरा लपवला आहे. तर स्काउट त्या बाथटबमध्ये उभी आहे. स्काउटचा हा न्यूड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे फोटो शेअर करत स्काउटनं ‘हे माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्ष असणार आहे’, असं कॅप्शन देखील दिलं आहे. 

रणवीरनं न्यूड फोटोशूटवरून होणाऱ्याा ट्रोलिंगवर नेटकऱ्यांना दिलं सडेतोड 

गुरुवारी रात्री उशिरा रणवीर सिंगचे काही फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. ज्यामध्ये तो न्यूड अवस्थेत दिसत आहे. यानंतर रणवीर सिंगचं हे लेटेस्ट फोटोशूट पाहताच व्हायरल झालं आणि सर्वत्र त्याची चर्चा सुरू झाली. खरंतर रणवीर सिंगने हे फोटोशूट पेपर मॅगझिनसाठी केलं आहे. तर यावर होणाऱ्या ट्रोलिंगवर रणवीर नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत रणवीरने आपला राग काढला आणि म्हणाला की, “मला तिथल्या लोकांची काळजी असेल. मी लोकांची पर्वा करत नाही. मी काय घालावं आणि काय घालू नये हे मी ठरवणार. लोकांचं काम फक्त बोलणं आहे. मला त्याची पर्वा नाही. एवढच नव्हेतर मी 1000 लोकांच्या समोर असं फोटोशूट करु शकतो”.

खरंतर, या वादग्रस्त फोटोशूटनंतर आता रणवीर सिंगवर सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे. ज्याच्या आधारे रणवीर सिंग ट्विटरवर ट्रेंड करत आहे. या फोटोशूटसाठी लोक त्याला खूप ट्रोल करत आहेत. एवढंच नाही तर पश्चिम बंगालच्या टीएमसी खासदार मिमी चक्रवर्ती यांनीही रणवीर सिंगच्या फोटोशूटवर कमेंट केली  आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *